शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी प्रकल्प कार्यालयांना रेमडेसिविरसाठी दहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

नंदुरबार : अनुसूचित जमातीच्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख रुपये ...

नंदुरबार : अनुसूचित जमातीच्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख रुपये न्युक्लीअस बजेटमधून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास के.सी.पाडवी यांनी दिली.

पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले, खासगी रुग्णालयात कोरोना आजारामुळे दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शनवर येणारा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांना न्युक्लिअस बजेटमधून १० लाख रुपयांपर्यंत निधी खर्च करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ॲड. पाडवी यांनी दिली.

रुग्णाचे उत्पन्न आठ लाखांपर्यंत असावे. खासगी रुग्णालय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत नसावे. आदिम जमाती, विधवा, परित्यक्ता निराधार महिला, अपंग, दारिद्र्यरेषेखालील रुग्णांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना उपचारासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कोविडविषयक उपाययोजनांसाठी आदिवासी विभागातर्फे १७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून एमडी डॉक्टर देण्याविषयी येत्या २१ तारखेला आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना जिल्ह्याला अधिक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन देण्याबाबत विनंती केली असल्याची माहितीदेखील ॲड. पाडवी यांनी दिली.

डॉ. भारूड म्हणाले, कोरोनाविषयक माहिती देण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. शहादा येथील ऑक्सिजन सुविधा असलेल्या कोविड सेंटरचे काम पूर्ण झाले असून ते क्रियान्वित होत आहे. तळोदा येथेदेखील ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. प्रत्येक पंचायत समितीला दोन वाहनांची सोय करत ग्रामीण भागात लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील अलगीकरण कक्षात ४५० कोरोनाबाधित व्यक्ती दाखल झाले आहेत. या अलगीकरण केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षणे आढळलेल्या बाधित व्यक्तींना कोविड रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे. मोठ्या गावांत लसीकरणासाठी शिबिरांचे आयोजन होत आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.