शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार निगमचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भारत दूरसंचार निगमचे वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या ...

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भारत दूरसंचार निगमचे वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प झाली असून, येथील असंख्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीने उभारलेल्या ग्रामसचिवालयात भारत संचार निगमचे दूरध्वनी कार्यालय आहे. परिसरात भारत दूरसंचारचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील दूरध्वनी कार्यालयाचे वीज बिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे.

त्यामुळे दूरध्वनी सेवा व भ्रमणध्वनी सेवा चार दिवसांपासून कोलमडली असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. या सेवेसंदर्भात ग्राहक वारंवार तक्रार देण्यासाठी जात असून ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. येथील बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा नेहमीच वारंवार ठप्प झालेली असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.