शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहनाने प्रवास करुन तहसीलदारांचे रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यवतमाळ जिल्ह्यात नायब तहसीदारावर वाळूमाफियाने हल्ला केल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या प्रकाराचा राज्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यवतमाळ जिल्ह्यात नायब तहसीदारावर वाळूमाफियाने हल्ला केल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या प्रकाराचा राज्यातून निषेध होत असताना जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. परंतु हे आंदोलन शासनाच्या तिजोरीलाचा भार देणारे ठरले असून आंदोलनासाठी सर्वच अधिकारी शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने चर्चा रंगत होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले. मंगळवारी हे आंदोलन करण्यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात तहसीलदार व नायब तहसीलदार यांना जिल्हा खजिन निधीतून सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, विविध मागण्यांही निवेदनातून राज्य शासनाकडे करण्यात आल्या. एकीकडे हे आंदोलन करण्यासाठी सामूहिक रजा घेणाऱ्या तहसीलदार व नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहाेचण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर केला. ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी असल्याचे दिसून येत होते. शासकीय नियमांनुसार रजेवर असलेल्या अधिकारी हे शासकीय वाहनांचा उपयोग करू शकत नसल्याची माहिती आहे. त्यातून सामूहिक रजेवर असल्याने सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याची अपेक्षा होती. परंतु तसे न हाेता सर्वच वाहनांचा उपयोग हा आंदोलनासाठी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराची चाैकशी होऊन अधिकारी डिझेलचा खर्च परत करतील किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान दुपारी देण्यात आलेल्या निवेदनावर निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप कदम, तहसीलदार संदीप कोळी, डाॅ. मिलींद कुलकर्णी, गिरीश वाखारे, भाऊसाहेब थोरात, डाॅ. उल्हास देवरे, अजित शिंत्रे, नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे, श्रीकांत लोमटे, एस.पी.गवते, बी.व्ही. अहिरराव, जितेंद्र पाडवी, महेश वाणी यांच्यासह जिल्ह्यातील नायब तहसीलदारांच्या सह्यात आहेत. 

चालकांच्या एकदिवसीय वेतनाचाही प्रश्न  दरम्यान तहसीलदारांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्यासाठी शासकीय सेवक असलेल्या वाहनचालकांचा उपयोग झाला. अधिकारी सुटीवर आणि चालक कामावर असा हा प्रकार होता. यातून चालकाला नेमक्या कोणत्या कर्तव्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आणले गेले. याची चर्चा महसूली वर्तुळात सुरु होती. या चालकांचे एका दिवसाचे वेतन नेमके कसे होणार याकडे लक्ष लागून आहे. या प्रकाराची दिवसभर महसूल वर्तुळात चर्चा रंगली होती.