शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही रखडण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी बदल्या होणार नसल्याने दुर्गम भागातील ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही रखडण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी बदल्या होणार नसल्याने दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. यंदा बदलीच्या धोरणात काही प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

शासनाने कोरोनाचे कारण देऊन ३० जूनपर्यंत कुठल्याही प्रवर्गाच्या बदल्या करू नये असे आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रखडल्या आहेत. जिल्ह्यात अर्थात जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वाधिक असलेल्या आणि गाजणाऱ्या बदल्यांमध्ये प्राथमिक शाळा शिक्षकांचा समावेश असतो. गेल्या दोन वर्षांपासून या शिक्षकांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांची दुर्गम अर्थात अवघड भागातील सेवा कालावधी वाढून त्याच्या बदल्यांची प्रक्रिया लांबणार आहे.

ऑनलाईन पोर्टल

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी चार वर्षांपूर्वी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले होते. त्यानुसार थेट राज्यस्तरावरूनच बदली प्रक्रिया राबविली जात होती. त्याला सुरुवातीला शिक्षक संघटनांचा विरोध झाला. परंतु या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अगदीच कमी आणि पारदर्शकता अधिक राहत असल्याने शिक्षक संघटनांनी देखील या प्रक्रियेला स्वीकारले. त्यानुसार दोन वर्ष अर्थात २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात बदल्या झाल्या. गेल्या वर्षी अर्थात २०२० मध्ये बदल्या कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. यंदाही तीच स्थिती आहे.

अवघड व सोपे क्षेत्र

ऑनलाईन बदली प्रक्रिया तयार करताना जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्र ठरविण्यात आले. त्यावरून देखील अनेकवेळा वाद झाले. त्यात वेळोवेळी बदल देखील झाले. ज्यांनी कधीही अवघड क्षेत्रात सेवा केली नाही त्यांना त्या भागात बदली करून जाणे आवश्यकच होते. आता नाही तर पुढे कधीतरी जावे लागेल या भावनेतून अनेकांनी अवघड क्षेत्रात बदली करून घेतली.

किमान तीन वर्ष अवघड भागात सेवा झाल्यानंतर सोप्या भागात सेवा करण्यास त्यांना नंतरच्या कालावधीत सोयीचे ठरणार आहे. मात्र आता दोन वर्षांपासून बदल्या रखडल्याने त्यांचा त्या भागातील सेवा कालावधी देखील वाढणार अशी शक्यता आहे.

शिक्षकच करतात बदल्या...

शिक्षकच शिक्षकांच्या बदल्या करतात असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण पोर्टलवर एका शिक्षकाला २० पर्याय द्यावे लागतात. एकमेकांना खो देखील या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे शिक्षकांना आपल्या आवडीच्या २० पैकी एका ठिकाणी हमखास बदली मिळतेच अशी सोय या पोर्टलमध्ये आहे.

यंदा काही प्रमाणात बदल

यंदा बदल्यांच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे या बदलाविषयी शिक्षकांमध्ये उत्सुकता होती. परंतु बदल्याच रद्द झाल्याने ती आता पुन्हा ताणली गेली आहे.

आंतरजिल्हा बदल्यांना फायदा

पूर्वी आंतरजिल्हा बदल्या करतांना शिक्षकांना मोठा खटाटोप करावा लागत होता. वेळ व पैसा वाया जात होता. परंतु ऑनलाईन पोर्टलमुळे अनेक शिक्षकांचे आपल्या जिल्ह्यात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. गेल्या चार वर्षांपासून या बदल्या होत असल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.