शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी शिक्षकाची अशीही धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:46 IST

नथ्थू जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील बोरवण येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी गरीब ऊसतोड मजुरांच्या ...

नथ्थू जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील बोरवण येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी गरीब ऊसतोड मजुरांच्या मुलांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून चक्क या शाळेतील एका शिक्षकानेच दैनंदिन शिक्षणाचे काम सांभाळून विद्यार्थ्यांचे लांब वाढलेले केस कर्तन करून चांगला संदेश दिला आहे.तालुक्यातील बोरवण येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे ऊसतोड मजूर आहेत तर उर्वरित कोतवार समाजाचे असून टोपली विणण्याचे काम करतात. येथे संपूर्ण आदिवासी समाजाची वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उदरनिर्वाहासाठी पालक बाहेरगावी आपल्या मुलांना घेऊन जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मात्र येथील शिक्षकांनी त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विनंती केल्याने काही मुले त्यांच्या आजी-आजोबांकडे राहतात.वयोवृद्ध आजी-आजोबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना त्यांच्या नातवंडांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे यातील बºयाच विद्यार्थ्यांचे डोक्यावरील केस हे बºयाच प्रमाणावर वाढलेले होते. लांब वाढलेल्या केसांमुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या विद्यार्थ्यांची अशी बिकट अवस्था पाहून शाळेतील शिक्षक दिलीप गावीत यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून स्वत: कैची घेऊन केस कटींग करण्याचा निर्धार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना याविषयी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनीही तयारी दर्शवली. त्यांनी एका विद्यार्थ्याचे केस कापल्यानंतर इतर विद्यार्थीही माझी कटींग करून द्या म्हणून सांगू लागले.या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही आनंद झाला. अशा प्रकारचे उपक्रम राबवीत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे काही पैसे वाचतील, विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जाणीव निर्माण होईल व स्थलांतरामुळे विद्यार्थी गळती काहीअंशी तरी थांबेल. दिलीप गावीत या शिक्षकाच्या उपक्रमशील कार्याचे विस्तार अधिकारी रेखा पवार, केंद्रप्रमुख सतीश कदमबांडे, मुख्याध्यापिका यशोदा वसावे व शिक्षकांनी कौतुक केले.