शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पंचायत समिती इमारतीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:08 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  येथील पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव सार्वजनिक विभागाकडे प्रशासकीय मान्यतेअभावी धूळखात पडला असून, जागेअभावी ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  येथील पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव सार्वजनिक विभागाकडे प्रशासकीय मान्यतेअभावी धूळखात पडला असून, जागेअभावी एकाच ठिकाणी चार उपविभाग कार्य करीत आहेत. साहजिकच यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असते. इमारतीचा ज्वलंत प्रश्न लक्षात घेऊन तो मार्गी लावावा, अशी जनतेची मागणी आहे. तळोदा पंचायत समिती सध्या तीन ते चार खोल्यांमध्ये भरत आहे. अशाच स्थितीत अर्धाडझनपेक्षा अधिक विभाग आपले कामकाज कसे बसे चालवित आहेत. एका छोट्याशा इमारतीत, तर तबल चार विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे कामासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनादेखील कोणता विभाग कुठे आहे. याचाच प्रश्न पडतो. येथील पंचायत समितीने नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडे ठराव पाठविला आहे. शिवाय जिल्हा परिषदेने ही तसा ठराव पाठवला आहे. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने साधारण सहा कोटी २७ लाखांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सात ते आठ महिन्यांपूर्वीच पाठवला आहे. परंतु हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेअभावी तसाच धूळखात पडला आहे. मंजुरीसाठी पंचायत समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधितांनी उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. वास्तविक एवढ्याशा इमारतीत काम करताना कर्मचाऱ्यांंना मोठी कसरत करावी लागत असते. निदान लोकप्रतिनिधींनी तरी इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आहे.

नागरिकांच्या कक्षात झाले अतिक्रमणमाजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी आपल्या निधीतून ग्रामीण भागातून पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी गेल्या १० वर्षापूर्वी कक्ष आभरला आहे. परंतु या कक्षात पंचायत समितीच्या पदाधिकारींसाठी दालन केले आहे. साहजिकच नागरिकांनादेखील बसणं व विश्रांती करिता जागा नाही.त्यांना कार्यालया बाहेर तासन तास ताटकळत उभे राहावे लागते. बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. वास्तविक पंचायत समितीने आपल्या मालकीच्या गट साधन केंद्रातील प्रशस्त जागेचा प्रस्ताव इमारतीच्या बांधकामसाठी पाठवला आहे. तथापि कार्यवाही अभावी तो लाल फितीत अडकला आहे.