शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ महाविद्यालय व जलशक्तती ग्राम अभियान शैक्षणिक वर्षात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्टÑीय सेवा योजनेतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ती ग्राम हे नाविण्यपूर्ण उपक्रम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्टÑीय सेवा योजनेतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ती ग्राम हे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व नोडेल आॅफिसर डॉ.माधव कदम यांनी दिली.भारत सरकार उच्च शिक्षण विभाग,मानव संसाधन मंत्रालय व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद ,हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक साठी आॅनलाइन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिल्हानिहाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी कोरोना नंतरच्या काळातील स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ति ग्राम अभियान या विषयावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद हैदराबाद संस्थेच्यावतीने एक दिवशीय आॅनलाइन कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे होते .जिल्हा समन्वयक व नोडल आॅफिसर प्रा. डॉ. माधव कदम यांनी अभियान व कार्यशाळे संदर्भात प्रास्ताविक केले. तर उद्घाटनपर मनोगतातून डॉ. साळुंके यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे सतत सरकार आणि समाजाच्या विधायक उपक्रमात सहभागी होत आली आहे .कोरोना काळात व नंतरच्या कालखंडात स्वच्छ महाविद्यालय आणि जलशक्ति ग्राम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून त्या प्रभावीपणे राबवावे असे आवाहन केले.जिल्ह्यातील सर्व २० महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी, सहाय्यक व महिला कार्यक्रमाधिकारी आणि दोन्ही विभागीय समन्वयक सहभागी झाले होते. या सगळ्यांना स्लाईड शो च्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण परिषद हैदराबादच्या प्रशिक्षक आणि कार्यशाळेच्या संयोजक मनीषा करपे यांनी मार्गदर्शन केले. समारोपात विद्यापीठाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी कार्यशाळा चा आढावा घेतला. आभार शहादा विभागाचे समन्वयक डॉ. संदीप गरुड यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विभाग समन्वयक डॉ. बी एस पाटील, डॉ. संदीप गरुड यांनी परिश्रम घेतले.