शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

अश्व नृत्य स्पर्धेत ‘सूर्याभाई’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये मंगळवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये मंगळवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २५ स्पर्धक घोड्यांनी सहभाग नोंदवला. अश्व नृत्य पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या घोडे मालकांना सन्मानीत करण्यात आले. दरम्यान, बुधवारी या स्पर्धांचा अश्व दौड स्पर्धेने समारोप होणार आहे.चेतक फेस्टीवल समितीतर्फे येथे विविध अश्व स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात विलास मसिह यांची ‘सूर्याभाई’ घोड्याने प्रथम, श्रवणसिंग वाघेला यांची ‘जानकी’ घोडी द्वितीय तर तृतीय क्रमांक आर.के. खान यांच्या ‘नवाब’ या घोड्याने पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस ताराचंद धर्मा चौधरी यांच्या ‘सुलतान’ घोड्याला देण्यात आले. विजेत्या घोडे मालकांना अनुक्रमे ७१, ५१ व ३१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून जयपालसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल, सचिन गवळी, तुषार पाटील यांनी काम पाहिले. विजेत्यांना इंदूर येथील प्रदीप सिंह, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी महेंद्र गिरासे, भरत धोबी, विवेक वाडिले, एकनाथ गिरासे, अजय पाटील, विनोद तावडे, विलास चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले.मंगळवारी झालेल्या अश्व नृत्य स्पर्धेत सहभागी घोड्यांनी नृत्याचा अविष्कार करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ढोल व ताशाच्या गजरात अश्वांनी नृत्य सादर करीत अनेक कसरतीही सादर केल्या. बुधवारी अश्व दौड स्पर्धा होऊन अश्व स्पर्धांचा समारोप होणार आहे.