शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी परिसरात बालकांचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : लॉकडाऊनमुळे अंगणवाडीतील बालकांचे वजन घेण्यासह इतर बंद असलेली कामे आता सुरू झाली असून, कुपोषणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : लॉकडाऊनमुळे अंगणवाडीतील बालकांचे वजन घेण्यासह इतर बंद असलेली कामे आता सुरू झाली असून, कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागातर्फे बालकांच्या सर्वेक्षणाची मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या अंगणवाड्यांमधील किलबिलाट सुरू झाली आहे.हा समुदाय आरोग्य अधिकारींकडून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि सॅम-मॅम बालकांची धडक शोध मोहिम यासारखी कामेही युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. जेणे करून कुपोषणाने डोकेवर काढू नये यासाठी सीएचओ विशेष मेहनत घेत आहेत.दरम्यान, सुमदाय व आरोग्य अधिकारी सर्वच तरूण असल्याने त्यांच्यात आरोग्य सेवा बजावतांना तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना कमालीचा उत्साह दिसून येत असल्याचे चित्र आहे.समुदाय आरोग्य अधिकारी हे पद प्रत्येक आरोग्य उपकेंद्राला एक या प्रमाणे कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरण्यात आले असले तरी या डॉक्टरांकडून कोरोनाच्या काळात नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कर्तव्य पार पाडत आहे. आपापले उपकेंद्र सांभाळत आपल्या उपकेंद्राच्या परिसरातील ग्रामस्थांनाही ते कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे. तरी शासनाने त्यांच्या कामाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्व सामान्यांकडून होत आहे.