शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

मोहिदा शिवारातील शासकीय कोविड सेंटरसह शहरात सहा खाजगी कोविड सेंटरला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या ...

मोहिदा शिवारातील शासकीय कोविड सेंटरसह शहरात सहा खाजगी कोविड सेंटरला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने सर्वच रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहेत. रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने उपचारासाठी इतर जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यामध्ये नातेवाईक बाधितांना घेऊन जात आहेत.

खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची मागणी असते. शहाद्यात या खाजगी रुग्णालयांना मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा व गुजरात राज्यातील अंकलेश्वर, सुरत तसेच धुळे शहरातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. कोरोना संक्रमण कालावधीत साधारणत: दररोज दीडशे ते दोनशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जात आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मध्य प्रदेश व गुजरात राज्य शासनाने महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्यास बंदी घातल्याने या रुग्णालयांसमोर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजअभावी सात रुग्णांना आपला जीव गमवण्याची वेळ आली. अनेक कोविड सेंटर चालकांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या रूग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्या तर काहींनी चक्क नवीन बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यास बंद केले. यामुळे बाधितांसह त्यांच्या नातेवाईकांवर ऑक्सिजन बेड शोधण्यासह ऑक्सिजन सिलिंडर कुठे मिळेल यासाठी वणवण भटकंती करावी लागली. ऑक्सिजनअभावी या रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नवीन रुग्णांना दाखल करून घेणे शक्य नसल्याने सहापैकी दोन कोविड सेंटर चालकांनी सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.

बाधितांची संख्या दिवसेंदिवस विक्रमी गतीने वाढत असल्याने अनेक बाधितांना त्यांचे नातेवाईक उपचारासाठी इतरत्र हलवत आहेत. यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. शहरात कार्डियाक सेमीकार्डियाक रुग्णवाहिका आहेत या रुग्णवाहिकांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. ऑक्सिजन सिलिंडर नसेल तर या रुग्णवाहिकाद्वारे गंभीर पेशंटला इतर हलविणे शक्य नसल्याने ऑक्सिजनअभावी या रुग्णवाहिका सध्यातरी कुचकामी ठरत आहेत. कोविड सेंटर चालकांसह रुग्णवाहिकांचे चालक-मालक व इतर स्वयंसेवी संस्था दिवसभर ऑक्सिजन सिलिंडरच्या शोधात असल्याने रूग्णांना इतरत्र हलवण्यासाठी चार ते पाच तास उशीर होत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे अन्यथा येथे दाखल रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू शकतो.

ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी गुजरात व मध्य प्रदेश शासनाची उच्चस्तरावर चर्चा करत मार्ग काढावा, अशी मागणी शहरातील कोविड सेंटर चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी याची गंभीर दखल घेत ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादारासोबत तसेच दोन्हीकडील जिल्हा प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारकडून पत्रव्यवहार व चर्चा केली आहे. लवकरच यावर मार्ग निघणार आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा