ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: April 11, 2018 01:09 PM2018-04-11T13:09:54+5:302018-04-11T13:09:54+5:30

लसीकरणाला झाला उशिर

A summer rush of cattle | ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ

ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ

Next

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : शासनाकडून लसींचा उशिरा पुरवठा झाल्याने पशुधनाला हिवाळ्यात देणे गरजेच्या असलेल्या लसी ऐन उन्हाळ्यात देण्यात येत आह़े त्यामुळे मुक्या जनावरांची मोठय़ा प्रमाणात होरपळ होत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आह़े
गो वर्ग वंशात मोडल्या जाणा:या गाई, म्हशी, बैल आदींना लाळ्या व खुरकुत या रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असत़े नियमानुसार हे लसीकरण शित काळात म्हणजेच हिवाळ्यात होणे गरजेचे असत़े लाळ्या व खुरकुतची लस ही जनावरांना जड पडत असल्याने याचे काही प्रमाणात दुष्परिणामही होऊ शकता परंतु हिवाळ्यात लस दिल्यास या दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असत़े त्यामुळे लसीकरणाचा उत्तम काळ हा हिवाळा असतो़ परंतु लस उत्पादन करणा:या कंपन्यांचे ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ उशिरा ठरल्याने परिणामी संबंधित लसींचा पुरवठाही उशिरा झाला़ त्यामुळे हिवाळ्या करण्यात येणारे लसीकरण जिल्हा पशुधनसंवर्धन विभागाकडून उन्हाळ्यात पूर्ण करण्यात येत आह़े राज्यस्तरावरुनच उशिरा लसींचा पुरवठा होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़े
पावणे चार लाख पशुधनावर लसीकरण
पशुसंवर्धन विभागाला 4 लाख 5 हजार 550 गो वर्ग वंशाच्या पशुधनावर लसीकरण करण्याचे उद्दीष्टये देण्यात आले होत़े त्यापैकी साधारणत पावणे चार लाख पशुधनावर लसीकरण पूर्ण करण्यात आले आह़े उर्वरीत उद्दीष्टये येत्या काही दिवसात विभागाकडून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ 
आरोग्य खालावण्याचा धोका
हिवाळ्यात करण्यात येणारे लसीकरण उन्हाळ्यात होत असल्याने याचा परिणाम आता पशुधनाच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आह़े अवेळी देण्यात येत असलेल्या लसींमुळे पशुंचे वजन कमी होणे, अशक्तपणा, ताप येणे आदी दुष्परिणाम होण्याचा धोका असतो़ उन्हाळ्यात लसीकरण करण्यात येत असल्याने याचा दुष्परिणाम जनावरांवर होत असला तरी, ही लस देणेही महत्वाचे असल्याचे सांगण्यात आल़े लसीकरणाअभावी लाळ्या व खुरकुत या रोगाची दुध देणा:या पशुधनास लागण झाल्यास दुध देण्याची क्षमता कमी होत़े सोबतच बैल सारखे जनावरांमध्ये शेतात राबण्याचीही शक्ती उरत नसून अशक्तपणा येत असल्याचे सांगण्यात आले आह़े 
इतर लसींचीही वानवा
गो वंशाच्या पशुधना व्यतिरिक्त इतर वर्गात मोडणा:या जनावरांसाठी असलेल्या घटसर्प, क:या, पीपीआर आदीं लसीदेखील अद्याप विभागाला मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फतही वेळावेळी पाठपुरावा करण्यात येत आह़े  साधारणत मे महिन्याच्या शेवटार्पयत या लसी उपलब्ध होतील असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आह़े त्यामुळे या लसीदेखील कधी उपलब्ध होणार आणि प्रत्यक्षात पशुंना कधी दिल्या जाणार अशी चिंता आता जिल्ह्यातील पशुपालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
 

Web Title: A summer rush of cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.