शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

उपनगर पोलिसात तब्बल ४३ दुचाकी धूळखात, विल्हेवाट लावण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटरसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळखात पडल्या आहेत. ...

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटरसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळखात पडल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित मालकांना मोटरसायकल घेऊन जाण्यास सांगून ते आले नसल्याने आता एप्रिल महिन्यात या दुचाकींची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

दुचाकी चोरी झाली तर संबंधित जंगजंग पछाडतो. पोलिसांकडे तपासाबाबत चकरा मारल्या जातात. परंतु जेव्हा मोटरसायकल सापडते तेंव्हा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना नाकीनऊ येत असल्याने दुचाकीधारक ती घेऊन जाण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातदेखील गेल्या काही वर्षभरात दाखल विविध गुन्ह्यांतील तब्बल ४३ मोटरसायकली पडून आहेत. त्यांच्या मालकांना त्या घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी कळविण्यातदेखील आले आहे. परंतु संबंधित मोटरसायकल मालक त्या घेण्यासाठी आलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता त्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय उपनगर पोलिसांनी घेतला आहे.

यातील तब्बल २०१५ मध्ये दाखल गुन्ह्यातील दुचाकींचादेखील समावेश आहे. त्यात अनेक महागड्या दुचाकी देखील आहे. जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करणे आवश्यक असते. परंतु त्यासाठी विविध कागदपत्रे आणि प्रक्रिया कराव्या लागतात. त्या करतानाच संबंधितांच्या नाकीनऊ येतात. त्यापेक्षा ती मोटरसायकल न घेतलेली बरी अशी मानसिकता होते. त्यामुळेच संबंधित अशा मोटरसायकली घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे. आता अशा दुचाकींची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदवाळकर यांनी सांगितले.