शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसला तीन तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसला तीन तर एमआयएम व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले. तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला सभापतीपद मिळाले आहे. आजच्या बैठकीत भाजपच्या दहापैकी नऊ नगरसेवकांनी गैरहजर राहणे पसंत केले.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत विषय समिती सभापती व सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अर्थ व नियोजन समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, आरोग्य सभापतीपदी वर्षा जोहरी, पाणीपुरवठा सभापतीपदी लक्ष्मण बढे, बांधकाम सभापतीपदी वसीम तेली, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विद्या जमदाळे यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीला मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, काँग्रेस व एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.पालिकेत काँग्रेस ११, भारतीय जनता पक्ष १०, एमआयएम चार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. पालिकेत काँग्रेस एमआयएम युती असून गेल्या तीन वर्षापासून सर्व विषय समित्यांवर या युतीचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने पाचही विषय समित्या त्यांच्या ताब्यात होत्या. मात्र तीन वर्षानंतर पहिल्यांदा महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या विद्या जमदाळे यांची निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आजच्या सभेला भारतीय जनता पक्षाचे गटनेता आनंदा पाटील यांनी अर्ज भरण्याच्या मुदतीत विषय समिती सदस्य पदासाठी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवली. नंतर बैठकीतून काढता पाय घेतला तर उर्वरित आठ नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिले. सर्व विषय समित्यांचे सभापती व सदस्य यांची बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व काँग्रेसचे गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी नवनियुक्त सभापतींचे पुष्पहार देऊन अभिनंदन केले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा परिषदेच्या सभापती जयश्री पाटील यांनीही अभिनंदन केले. तत्पूर्वी डीजेच्या तालावर नवनिर्वाचित सभापती व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत महात्मा गांधी पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विषय समित्यांचे सभापती व सदस्यस्थायी समिती- सभापती मोतीलाल फकीरा पाटील, रेखाबाई भानुदास चौधरी, वसीम सलीम तेली, उषाबाई अरविंद कुवर, वर्षा राजेंद्र जोहरी, लक्ष्मण नथ्थू बढे, विद्या जितेंद्र जमदाळे, अन्सारी अखलाक अह.रहीम, रिमा विनायक पवार, पिंंजारी वाहीद शे.रशीद.सार्वजनिक बांधकाम समिती- सभापती तेली वसीम सलिम, संगीता वसंत मंदील, पठाण शहेरनाज अजहरखान, प्रशांत विक्रम निकुंभे, संजय गोरख साठे, संदीप शंकर पाटील, सुमनबाई विश्राम पवार.शिक्षण समिती- सभापती उषाबाई अरविंद कुवर, ज्योती एकनाथ नाईक, संगीता योगेश चौधरी, संजय गोरख साठे, आनंदा पांंडू पाटील, संदीप शंकर पाटील, सैयद सायराबी लियाकतअली.सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय समिती - सभापती वर्षा राजेंंद्र जोहरी, कुरेशी शमीमबी शे.हकीम, ज्योती एकनाथ नाईक, योगीता संतोष वाल्हे, अन्सारी सईदाबी साजीद, अनिता निलेश पाटील, सैयद सायराबी लियाकतअली.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- सभापती लक्ष्मण नथ्थू बढे, सदस्य ज्योती एकनाथ नाईक, संगीता वसंत मंदील, आनंदा पांडू पाटील, प्रशांंत विक्रम निकुंभे, कुरेशी रियाज अहमद अ.लतीफ, सैयद सायराबी लियाकतअली.नियोजन व विकास समिती- सभापती रेखाबाई भानुदास चौधरी, सदस्य पठाण शहेरनाज अजहरखान, सुमनबाई विश्राम पवार, शे.ईकबाल शे.सलीम, अन्सारी सईदाबी साजिद, अनिता निलेश पाटील, पिंंजारी जाहेदाबी रहीम.महिला व बाल कल्याण समिती- सभापती विद्या जितेंद्र जमदाळे, सदस्य कुरेशी शमीमबी शे.हकीम, सुमनबाई विश्राम पवार, पठाण शहेरनाज अजहरखान, रेखा भरत पटेल, योगीता संतोष वाल्हे, पिंंजारी जाहेदाबी शे.रहीम.