शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना उजळणी, बाराखडीचा पडू लागला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे; परंतु हे ...

मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे; परंतु हे शिक्षण म्हणावे तसे प्रभावी राहिले नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल हातात पडतात. मुले पे-गेम, कार्टून यांसारख्या खेळात रंगू लागली आहेत, तसेच जास्तीत जास्त वेळ टीव्हीवर वेगवेगळा कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवत आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना उजळणीचा विसर पडू लागला; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. चौथी पाचवीच्या मुलांना भागाकार आणि गुणाकार कसा करायचा, या विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तके वाटप झाली; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हे सुद्धा माहिती नाही. ऑनलाइन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत; परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुलेच पालकांना देऊ लागली आहेत. यापेक्षा वास्तव अनुभव यावा म्हणजे यावर्षी जून महिन्यात इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले; पण वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजींची भेट झाली नाही, तसेच बाराखडी अक्षरे वाचली नाही तरी ही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, गुगल मीट यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले; परंतु विद्यार्थ्यांनी त्याकडे नियमित पाठ फिरविली. ज्ञानाची ही पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या पुढील काळात शिक्षकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

नव्या शैक्षणिक सत्रात कसरत

मागील वर्षापासून शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले आहेत. साहजीकच त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत मोठा फरक जाणवत आहे. परिणामी, भविष्यात या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.