शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचारावर पथनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘महिलांवर वाढता अत्याचार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘महिलांवर वाढता अत्याचार (माणुसकीला काळं फासणारा)’ या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती केली.या वेळी जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील, माधवी पाटील, तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.टी. सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव हेमंत पाटील, डॉ.बी.डी. पटेल, डॉ.वसंत पाटील, नगरसेवक संजय साठे, मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार उपस्थित होते.शहरातील सप्तशृंगी माता मंदिर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक व जनता चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे ‘महिलांवर वाढता अत्याचार (माणुसकीला काळं फासणारा)’ या विषयावर जनजागृती केली. सध्या महिलांवर वाढत चाललेले अत्याचार तसेच महिलांवर कशा पद्धतीने हल्ले केले जातात याचे एक उदाहरण म्हणून अ‍ॅसिड हल्ला कसा केला जातो याचे सादरीकरण केले. तसेच अशाप्रकाराचे हल्ले बंद व्हावेत यासाठी या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.पथनाट्याच्या शेवटी प्रतिज्ञा घेतली व त्यात सर्वांनी महिलांचा आदर करणे, हल्ले करायचे नाही, चांगली वर्तणूक करायला हवी, कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ देणार नाही. ‘सोचेगा इंडिया, समझेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया’ असा संदेश विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. समारोपप्रसंगी डॉ.बी.डी. पटेल, डॉ.वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.एच.पी. सूर्यवंशी तर आभार प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.