शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

नवापूर : आठवडाभरापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सात दिवसात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात एकूण ५ ...

नवापूर : आठवडाभरापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सात दिवसात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्री फार्मच्या बर्ड फ्लू बाधित कोंबड्यांचे सलग सातव्या दिवशी किलिंग करण्यात आले. शनिवारी बर्ड फ्लू प्रभावी चार पोल्ट्रीतील ६८ हजार ६८० कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. यात गॅलेक्सी पोल्ट्रीतील २८ हजार ३४८, हुस्ना पोल्ट्रीतील १२ हजार ७२२, डॉन पोल्ट्रीतील १४ हजार ३२०, निशा पोल्ट्रीतील १२ हजार ८९० असे आज चार पोल्ट्रीमधील ६८ हजार ६८० पक्षी नष्ट करण्यात आले. आतापर्यंत ५ लाख ७८ हजार ८९० पक्षी नष्ट करण्यात आले. आज ६ लाख ३५ हजार ५४७ अंडी नष्ट केली. एकूण २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट केली. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील ९५ पथकामार्फत किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले साधारणता साडेचारशे ते पाचशे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूर मध्ये मुक्कामी होते. धुळे, जळगाव, नगर, नाशिक जिल्ह्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांना शनिवारी कार्यमुक्त करण्यात आले आहे. केवळ नंदुरबार जिल्ह्यातील ११० पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी थांबले आहेत. नवापूर शहरातील पाच पोल्ट्रीतील पक्ष्यांचा अंडी व पक्षी नष्ट करण्याचे काम पुढील आदेश आल्यानंतर करण्यात येणार आहे यामध्ये पॅराीनयर पोल्ट्री २८ हजार, पक्षी पॅराडाईज ४ हजार ६०० पक्षी रीची सहा हजार पक्षी अशरफ पोल्ट्री,१२ हजार पक्षी ,सेफ पोल्ट्री ७० हजार पक्षी या पाच पोल्ट्रीमधील लाखो अंडी व पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया आदेश प्राप्त झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे. नवापूर परिसरातील २८ पोल्ट्री मधील आठवडाभरापासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कलिंग प्रक्रिया संपल्याने केवळ पशुखाद्य नष्ट करण्याचे काम आता राहिले आहे. रविवारपासून पोलीस बंदोबस्त काढण्यात येणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.

नवापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून सर्व पोल्ट्रीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचे उत्तम नियोजन दिसून आले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पोल्ट्रीतील एक ही वस्तू अथवा पोल्ट्रीमध्ये बाहेरील वस्तू येऊ दिले नाही, चोख बंदोबस्त पोलिसांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर शेजारील गुजरात राज्यातील नेशनल पोल्ट्री येथे सुद्धा आठवडाभर सीमावर्ती भागात बर्ड फ्लू नियंत्रणासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती तसेच सीमा तपासणी नाक्यावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.