दुग्ध व्यवस्थापन संघाचे मागण्यांबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:50+5:302021-07-31T04:30:50+5:30

पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष डॉ. वसंत पाडवी व उपाध्यक्ष रवींद्र वसावे यांनी हे ...

Statement regarding the demands of the Dairy Management Team | दुग्ध व्यवस्थापन संघाचे मागण्यांबाबत निवेदन

दुग्ध व्यवस्थापन संघाचे मागण्यांबाबत निवेदन

पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष डॉ. वसंत पाडवी व उपाध्यक्ष रवींद्र वसावे यांनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संघाच्या सर्व मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून, या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. त्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागातील व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या पदाचे सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, राज्यातील पशुसंवर्धन विभागातील शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेत पशुधन पर्यवेक्षक पदास नोकरीस पात्र असतानाही पशुधन पर्यवेक्षक पदावर पदवीधारकांची नियुक्ती न करता फक्त पदविकाधारकांची नियुक्ती करण्यात यावी, राज्य शासनाने विविध शासकीय विद्यापीठ, सरकारी क्षेत्र दूध संघ, शासकीय दूध डेअरी, शेळी-मेंढी प्रकल्प या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्या, तसेच स्वयंरोजगारासाठी कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, गाय-म्हैस पालन यासाठी १० लाख रुपये कर्ज स्वरूपात देण्याची अशी तरतूद करावी किंवा विशेष नावीन्यपूर्ण योजना तयार कराव्यात, आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना डॉ. वसंत पाडवी, उपाध्यक्ष रवींद्र वसावे, मानसिंग पाडवी, विलास वसावे, तुकाराम राऊत, विजय पाडवी, गोरख राऊत, दिवाकर पाडवी, बलवंत वसावे, दित्या वळवी, रामसिंग वसावे, दिलीप वसावे, आदी उपस्थित होते.

Web Title: Statement regarding the demands of the Dairy Management Team