शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी कंपनीचा टाॅवर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

स्वच्छतेची गरज नंदुरबार : तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छतेअभावी रोगराईची भीती आहे. तालुक्यातील गावांमध्ये गटारे नादुरुस्त असल्याने सांडपाण्याची समस्या ...

स्वच्छतेची गरज

नंदुरबार : तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छतेअभावी रोगराईची भीती आहे. तालुक्यातील गावांमध्ये गटारे नादुरुस्त असल्याने सांडपाण्याची समस्या आहे. सांडपाणी योग्य पद्धतीने काढण्यासाठी गटारांची निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरी भागात चिंचविक्रीतून रोजगार

नंदुरबार : शहरातील विविध भागांत चिंचविक्री करणारे दिसून येत आहेत. माफक दरात आंबट गोड चिंचा उपलब्ध होत आहे. तालुक्यातील विविध भागांतील झाडांवर मोठ्या प्रमाणावर चिंचा लगडल्याचे दिसून येत आहे. या चिंचा तोडून ग्रामीण भागातील युवक शहरी भागात विक्रीसाठी आणत आहेत. यातून त्यांना दरदिवशी रोजगार उपलब्ध होत आहे. तालुक्यासोबत तळोदा व शहादा तालुक्यांतही चिंचातोडणीचे काम सुरू आहे.

वळणरस्त्यावर भरधाव डम्पर पुन्हा वाढू लागले

नंदुरबार : शहरातील नवापूर चाैफुली ते तळोदा रोडपर्यंतच्या वळणरस्त्याने वाळू वाहणारे डम्पर पुन्हा धावत आहेत. यातून या मार्गाने दिवसा प्रवास करतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत. या डम्परचा वेग मर्यादेत ठेवण्याची मागणी आहे.

ग्रामीण भागात मिळतोय प्रतिसाद

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दक्षता घेतली जात असल्याचे चित्र असून मास्कचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागात मास्कची विक्री वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.

टोप्या आणि रुमालांची दुकाने सुरू

नंदुरबार : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरातील विविध भागांत बागायती रुमाल आणि टोप्या यांची विक्री सुरू झाली आहे. प्रामुख्याने फॅन्सी टोप्यांना युवक व लहान बालकांकडून पसंती दिली जात आहे. तर, बागायती रुमालांची विक्री वाढली आहे.

खड्डे बुजवलेच नाहीत

नंदुरबार : कोळदे ते नंदुरबारदरम्यान रस्त्यावरचे खड्डे नागरिकांनी पाठपुरावा करूनही योग्य पद्धतीने बुजवलेले नाहीत. हे खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांची असून खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असल्याची माहिती देण्यात येत आहे. खड्ड्यांचा आकारही वाढला आहे.

पुलांची तपासणी करणे रखडले

नंदुरबार : पावसाळ्यात पूल पडणे व रस्ते खचण्याच्या दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी पुलांची तपासणी करून त्यांची डागडुजी करण्याचे आदेश आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे दिसून आले आहे.