शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच रुग्णालयात विशेष वॉर्ड सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावरील उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनी अद्ययावत बंदीस्त कक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावरील उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनी अद्ययावत बंदीस्त कक्ष स्थापन करावा. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी हे प्रत्येक तालुक्यात जावून याची खात्री करणार व जनजागृतीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून उपाययोजनेविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.शिवाजी सुकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडखे आदी उपस्थित होते. उपाययोजना, घेण्यात येणारी काळजी यासह विविध बाबींची माहिती डॉ.भारूड यांनी यावेळी दिली. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.याशिवाय उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या रुग्णालयात व कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र अद्ययावत कक्ष स्थापन करावा. रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांची व्यवस्थीत तपासणी करावी व औषधोपचार करावा. जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या आदेशांचे पालन करावे. वरिष्ठांच्या परवाणगीशिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये.खाजगी डॉक्टर्स यांनी आपल्या रुग्णालयात बंदीस्त वॉर्ड तयार करावा. मास्क, व्हेंटीलेटर, आॅक्सीजन पुरेसे उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. एन ९५ तसेच सर्जीकल मास्क यांचा अनावश्यक वापर, साहित्य व औषध विक्री जास्त किंमतीने होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.जिल्हा रुग्णालयात सहा खाटांचा स्वतंत्र व अद्ययावत कक्ष करण्यात आलेला आहे. संशयीत रुग्णांचे घशातील नमुना घेण्यात येवून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.हॉटेल्स, लॉजिंग धारकांनी परदेशातील नागरिक आल्यास व अशा प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात संदर्भीत करावे. त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले असल्यास तेथे निर्जंतूकीकरण करावे अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.याशिवाय जिल्ह्यातील ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये परदेशातील, परप्रांतातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तेथे विशेष काळजी घेण्याची सुचना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी दिली.

सौदी मधून आलेल्या तिघांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.यासंदर्भात अफवा पसरविणारे, गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. सोशल मिडियावरही अतीरंजीत पोस्ट टाकू नये.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टिश्यू पेपर, नॅपकीन यांचा वापर, हात स्वच्छ धुण्याविषयी सुचना द्याव्या.विद्यार्थ्यांना भिती वाटेल अशा पद्धतीने कुठलीही कृती करू नये, जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा वापर करू नये.प्रत्येकाने शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अतीआवश्यक असेल तरच जावे परंतु योग्य काळजी घ्यावी.विनाकारण मास्क वापरण्याची गरज नाही. शिंकतांना, खोकतांना तोंडावर रुमाल वापरावा, हस्तांदोलन टाळावे. वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, मधुमेही रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यावी.