शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
6
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
7
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
8
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
9
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
10
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
11
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
12
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
13
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
14
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
15
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
16
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
17
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
19
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
20
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांसाठी लवकरच नंदुरबार येथे खास रेडिओ केंद्र

By admin | Updated: April 10, 2017 23:43 IST

कृषी विज्ञान केंद्रात सहक्षेपण केंद्र : स्थानिक भाषेतून कार्यक्रमांचे सादरीकरण, 76 लाख मंजूर, 20 किलोमीटरचे क्षेत्र

 मनोज शेलार ल्ल नंदुरबार : शेतक:यांना आधुनिक शेतीकडे वळविणे, हवामानाचा अंदाज व त्यानुसार पीक नियोजन करणे यासंदर्भातील माहिती स्थानिक बोलीभाषेत देता यावी यासाठी स्थानिक रेडिओ केंद्र नंदुरबारात सुरू होणार आहे. त्यासाठी 76 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे तिसरे रेडिओ केंद्र राहणार आहे.
नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागात आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता शेती करताना पिकांचे नियोजन करणे मोठे जिकिरीचे ठरते. शिवाय शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा पाहिजे तसा शिरकाव अद्यापही झालेला नाही. ही बाब लक्षात घेता शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, हवामानाआधारित पीक संगोपन व नियोजन करता यावे यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचीदेखील मोलाची भर पडत आहे. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून स्थानिक रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्णय कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे घेण्यात आला आहे. त्यास केंद्र शासनाचीदेखील मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात 76 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात हे रेडिओ केंद्र कार्यान्वित होणार   आहे.
कोळदा, ता.नंदुरबार शिवारात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात हे रेडिओ केंद्र उभारले जाणार आहे. त्याच ठिकाणी इमारत आणि सहप्रेक्षपण केंद्र कार्यान्वित राहणार आहे. त्याचे संचलन अर्थातच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र करणार आहे.
कार्यक्रमाचा, प्रक्षेपणाचा आणि कर्मचा:यांसह इतर खर्च पहिल्या तीन वर्षाकरिता केंद्र सरकार देणार आहे. त्यानंतर मात्र स्थानिक उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थात जाहिरात आणि प्रायोजकांच्या माध्यमातून मिळणा:या महसुलातून खर्च भागवावा लागणार आहे.
या रेडिओ केंद्राची प्रक्षेपण क्षमता सुरुवातीला केवळ 20 किलोमीटर अंतराची राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रक्षेपण क्षमता वाढविण्यात येणार आहे.
रेडियो केंद्रातून केवळ शेतक:यांसाठीच कार्यक्रमांचे प्रक्षेपण राहणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक बोलीभाषेत ते राहिल अर्थात मराठी आणि आदिवासी भाषेत हे कार्यक्रम सादर करण्यात येतील. हवामानाचा पूर्व अंदाज, त्यानुसार शेतक:यांनी काय करावे, त्या त्या हंगामातील पिकांची काळजी, पिकांचे नियोजन, पाण्याची पाळी, खतांचा मात्रा यासह देश आणि जगात कृषी क्षेत्रात काय उपक्रम चालले आहेत त्याची माहितीही दिली जाणार आहे. याशिवाय स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून शेती आधारित जनजागृतीपर कार्यक्रमही तयार करवून घेत त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. दररोज सायंकाळी दोन तास या रेडिओ केंद्रातून प्रक्षेपण केले जाणार आहे.
राज्यातील तिसरे
राज्यात नंदुरबारचे रेडिओ केंद्र हे तिसरे केंद्र राहणार आहे. यापूर्वी बारामती येथे हे केंद्र सुरू करण्यात आले. तेथील यशस्विता लक्षात घेत बाभळेश्वर (जिल्हा अहमदनगर) येथे सुरू करण्यात आले. आता खास बाब म्हणून नंदुरबारात हे रेडिओ केंद्र कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू होत आहे.
नंदुरबारसारख्या आदिवासी भागात केंद्र शासनाने खास शेतक:यांसाठी रेडिओ केंद्र सुरू करण्यास परवानगी देणे ही मोठी बाब आहे. या माध्यमातून शेतक:यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे. लवकरच या केंद्राच्या कामास सुरुवात होणार आहे.
-सुभाष नागरे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.