शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेचरला सोसवेना रुग्ण भार शेवटी नातेवाईकच देतात आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अपघात किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आणले गेल्यानंतर कक्षात नेण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अपघात किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आणले गेल्यानंतर कक्षात नेण्यासाठी लागणा-या स्ट्रेचरची परिस्थितीच नाजूक असल्याचे दिसून आले आहे. यातून कर्मचारी आणि रुग्णासोबतचे नातलग यांनी हातभार लावल्यावर रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना होवू शकतो.   कोरोना महामारीपूर्वी साहित्य खरेदी करण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सातत्याने समोर येत होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दर दिवशी किमान २०० जण विविध कारणाने दाखल होतात. यातील काही अपघात तर काही गंभीर आजारी असल्याने याठिकाणी येतात. रुग्णवाहिकेतून येथपर्यंतच प्रवास सुकर असला तरी रुग्णालय आवारात आल्यानंतर मात्र जखमी किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला योग्य तेस्ट्रेचर मिळणे कठीण झाले असल्याचे केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले. रुग्णालयाचे कर्मचारी किंवा चालक मदतीला येत असले तरीही बहुतांश वेळा सोबत आलेल्या नातलगांनाच रुग्णाला स्ट्रेचरवर टाकून न्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे. 

रुग्णाला याठिकाणी घेवून आल्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. आरोग्य कर्मचारी न आल्याने मित्रांसह एकदोन नातेवाईकांना बोलावून घेत स्ट्रेचरवर टाकले. चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध झाले पाहिजेत. -राकेश पावरा,रुग्णाचा नातेवाईक,

मी माझ्या गावातील एकाला तपासणीसाठी आणले होते. त्याला चालता येत नसल्याने व्हीलचेअर मिळाली नाही. स्ट्रेचरही मिळत नसल्याने त्यांना हातात हात धरुन आधार देत एक्सरे रुम ते वरच्या मजल्यापर्यंत घेवून गेलो. -कर्मा पाडवी,रुग्णासोबतचे नातेवाईक,

जिल्हा रुग्णालयात सध्या चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर आहेत. रुग्णवाहिकेतून एखादा रुग्ण आल्यास तातडीने त्याला संदर्भित केलेल्या कक्षात दाखल करण्याची कारवाई होते. अशावेळी परिचारिका, परिचर आणि शिपाई मदतीला जातात. तसे आदेश करण्यात आले आहेत. काही वेळेस कर्मचारी इतर ठिकाणी असल्यास अडचणी येतात. नवीन साहित्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. -डाॅ. के.डी.सातपुते,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.