शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरांतून जपली सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : बामखेडातर्फे त:हाडी, ता.शहादा येथील एकता चौक मंडळाने सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. गेल्या 12 ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : बामखेडातर्फे त:हाडी, ता.शहादा येथील एकता चौक मंडळाने सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. गेल्या 12 वर्षापासून अखंड रक्तदान शिबिर घेऊन हजारो पिशव्या रक्त संकलित केले. यंदा शिबिराचे 13 वर्षे होते. त्यात 170 पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या.बामखेडातर्फे त:हाडी येथील एकता चौक मित्र मंडळ व धुळे येथील नवजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताहाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी माजी प्राचार्य आर.एम. चौधरी, माजी सरपंच शिवदास चौधरी, पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, सहायक परिवहन अधिकारी  विजय चौधरी, माजी प्राचार्य पी.सी. पटेल, माजी प्राचार्य व्ही.आर. पटेल, प्राचार्य एस.एस. चौधरी, नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, एकता चौक मित्र मंडळाचे सदस्य, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.येथील 13 तरुणांनी 2004 मध्ये एकत्रित येऊन एकता मंडळ स्थापन केले. ग्रामस्थांच्या मदतीने अखंड 12 वर्षे भागवत कथेचे आयोजन केले होते. 13 युवकांमधून काही जण बाहेरगावी असल्याने त्यांना उपक्रमात सहभागी होण्यात अडचण येत असल्याने त्यातील नरेंद्र पाटील, अरुण पटेल, अमोल पटेल, नरेंद्र पटेल, श्रीकांत पटेल, सुहास चौधरी, रवींद्र पटेल, देवेंद्र पटेल, रवींद्र पाटील आदी नऊ तरुणांनी आपली परंपरा ग्रामस्थांच्या सहकार्याने कायम ठेवली. रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 13 भागवत कथा पूर्ण झाल्या. परंतु सामाजिक कार्य पुढे नेण्याचा संकल्प करीत रक्तदान शिबिर ग्रामस्थांच्या मदतीने दरवर्षी दिवाळीदरम्यान आयोजित करीत आहेत.  यावर्षी 170 जणांनी रक्तदान केले. या वेळी धुळे येथील नवजीवन रक्तपेढीचे डॉ.सुनील पाटील, दिलीप जाधव, चंद्रकांत धनगव्हाळ, सुभाष खैरनार, चंद्रकांत राजपूत, जुनेद शेख, पांडुरंग गवळी, जयपाल गिरासे, मयुरी देशमुख आदींनी रक्तसंकलन केले.या वेळी गावातील तरुण विजय चौधरी यांची प्रथमच स्पर्धा परीक्षा देऊन नाशिक येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने तसेच महेंद्र पटेल यांनी 85 वेळा रक्तदान केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.