शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कंकाळामाळ आश्रमशाळा इमारतीचा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील कंकाळामाळ येथील शासकीय आश्रमशाळा अनेक वर्षापासून भाडय़ाच्या इमारतीत सुरू आहे. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील कंकाळामाळ येथील शासकीय आश्रमशाळा अनेक वर्षापासून भाडय़ाच्या इमारतीत सुरू आहे. दरम्यान, शाळा बांधकामासाठी ग्रामस्थ जमीन देण्यास तयार असून, तसा प्रस्तावही कार्यालयास पाठविण्यात आला आहे. मात्र अधिका:यांच्या उदासीनतेमुळे स्थिती जैसे थे आहे.तळोदा येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गत असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील अनेक आश्रमशाळांनी कात टाकली आहे. काही आश्रमशाळांचे करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. काही आश्रमशाळा अद्यापही भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या घरात सुरू आहेत. अशाच पद्धतीने अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडय़ाच्या कुशीतील कंकाळामाळ येथे पहिली ते सातवीर्पयत प्राथमिक शासकीय आश्रमशाळा आहे. गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरांमध्ये आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी अभ्यास व निवाराची सांगड घालून अध्ययनाचे कार्य करीत आहेत. येथील शाळेतील पट संख्या 200 च्या जवळपास असून, सात घरे भाडेतत्त्वावर शाळेसाठी घेतली आहेत. त्यापैकी एक कार्यालय आहे.आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन उच्चशिक्षित झाले पाहिजेत व पुढे कुठेतरी नोकरी मिळवून आपले जीवन योग्य प्रकारे घालवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आदिवासी विकास विभाग व शासन या आश्रम शाळांसाठी दरवर्षी कोटय़ावधी रुपये खर्ची घालत असते. मात्र अद्यापही तळोदा प्रकल्पांतर्गत अनेक आश्रमशाळा वाईट स्थितीतून जात आहेत. या शाळांमध्ये ना विज्ञानाच्या प्रयोगशाळा, ना भूगोलाची खोली, ना ग्रंथालय अशी विदारक स्थिती दिसून येते. कंकाळामाळ येथील प्राथमिक आश्रमशाळेत दोन शिक्षक व एक चौकीदार कायम असून, पाच शिक्षक व एक अधीक्षिका, तीन कंट्राटी कामाठी यांच्यावर शाळेचा रहाटगाडा सुरू आहे. यापैकी एक कामाठी कार्यालयात पाठवण्यात आला असून, दोन कामाठी या शाळेत कार्यरत असल्याचे सांगितले. याठिकाणी चार स्वयंपाकी असून, या चारही महिला मानधनावर काम करत आहेत. विद्याथ्र्याना पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरचे पाणी तर सोडा हातपंप व विहिरीच्या पाण्यावर आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. बहुतेक विद्याथ्र्याना स्नानसंध्या व प्रातविधीसाठी बाहेरच जावे लागते. या वर्ग खोल्यांमध्ये उजेडाचा अभाव दिसून येतो. मात्र अनेक दिवस लाईट नसल्यामुळे व सतत खंडित होणा:या वीजपुरवठय़ामुळे विद्याथ्र्याच्या अध्ययन व अध्यापनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक शिक्षक गेल्या 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर व मानधनावर सेवा बजावत आहे. मात्र शासन अद्यापही त्यांना कायम नोकरी बाबत शाश्वती देत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. यासाठी अनेक आंदोलने, रस्ता रोको करून घेराव घालण्यात येऊन देखील फक्त आश्वासनांचा पाऊस अद्यापर्पयत पडला असल्याचे बोलले जात आहे. अनेक शिक्षकांची वयाची मर्यादा पार होण्यात आहे. दिवसाला 115 रुपये तास प्रमाणे हे शिक्षक साधारणत: बारा हजार रुपये मानधनावर दुर्गम अतिदुर्गम भागात सेवा देत आहेत. कधीतरी शासन आपला विचार करेल व आपल्याला कायमस्वरूपी सेवेत सामावून घेईल या अपेक्षेने ही शिक्षक मंडळी अद्यापही अतिशय चांगल्या प्रकारे अध्यापनाचे कार्य आश्रमशाळांमध्ये करत आहेत. विद्याथ्र्याना डीबीटीच्या अंतर्गत रक्कम अदा करण्यात आल्यामुळे वह्या व इतर शैक्षणिक साहित्य स्वत: खरेदी करून ते शिक्षण घेत आहेत तर क्रमिक अभ्यासक्रमाचे पुस्तक आश्रमशाळेकडून पुरविले जात आहेत.कंकाळामाळ परिसरात कोणतीही दुसरी शासकीय आश्रमशाळा नसल्यामुळे येथील आश्रमशाळा इतरत्र हलविण्यात  गावक:यांनी विरोध दर्शविलेला आहे जेणे करून या परिसरातील मुलांना गावातच चांगल्या प्रकारे शिक्षण प्राप्त होऊ शकते.

कंकाळामाळ  येथे शासकीय आश्रमशाळा बांधण्यासाठी गावकरी जमीन देण्यास तयार आहेत व तसा प्रस्ताव तळोदा प्रकल्प कार्यालयात पाठविण्यात आला आहे. मात्र यावर अद्यापर्पयत कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे समजते. येथील जेहरसिंग पाडवी, राया सिता वसावे यांनी 2015 साला पासून जमीन आश्रम शाळेला देण्यासंदर्भात दानपत्र करून दिले आहे. मात्र हा प्रस्ताव कुठे लालफितीत अडकला आहे हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.