शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदाराकडून मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. त्यात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले असून तहसीलदार यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पी.एस. रावताळे यांनी गुरुवारी सकाळी धान्य वाटप करण्यासाठी सुरुवात केली. लाभार्थी दिलेले धान्य घरी घेऊन जात होते. त्यातील एका लाभार्थीने घरी धान्य मोजले असता प्रत्येक धान्यामागे किमान दोन किलो धान्य कमी निघाल्याचे निदर्शनास आले. काही ग्रामस्थांनी रेशन दुकानात जाऊन धान्य घेतले व तेथेच नवीन मोजमाप केले. त्यात लाभार्थी युवराज जºया वाघ याला २० किलो तांदूळ दिले होते. मात्र ते पुन्हा मोजले असता १८ किलो ८०० ग्रॅम एवढे वजन भरल. १० किलो गहू हे आठ किलो ८०० ग्रॅम एवढेच भरले. यावरुन स्वस्त धान्य दुकानदार हा मापात पाप करीत असल्याचे स्पष्ट झाले. दिवाण सुकºया खर्डे यांनीही १६ किलो तांदूळ घेतले होते ते मुळात १४ किलो ७०० ग्रॅम एवढेच भरले. विशेषत: हे सर्व धान्य त्याच रेशन दुकानदाराच्या वजन काट्यावर मोजण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करीत दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती. रेशन दुकानदार पीओएस माशीनमधील पावत्याही देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मोजून कमी भरलेले धान्य व वजन काटा गावकºयांनी ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीच्या खोलीत जमा केला आहे व वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना दाखवू, असा पवित्रा घेतला आहे.