शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बचाव आंदोलनतर्फे अक्कलकुव्यात घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : 11 लाख आदिवासी कुटूंबांना अपात्र ठरवणे नामंजूर असून 2006 च्या वनाधिकार कायद्याप्रमाणे सातपुडय़ातील आदिवासींना ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : 11 लाख आदिवासी कुटूंबांना अपात्र ठरवणे नामंजूर असून 2006 च्या वनाधिकार कायद्याप्रमाणे सातपुडय़ातील आदिवासींना प्राधान्य द्यावे यासह इतर मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे अक्कलकुव्यात निदर्शने करण्यात आली़ यावेळी गैरहजर असलेल्या तहसीलदार यांच्या खुर्चीला घेराव घालत आंदोलकांनी रोष व्यक्त केला़ अक्कलकुवा येथे सकाळी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कर्मचा:यांची एकच धावपळ उडाली होती़ नर्मदा बचाव आंदोलनातर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार होत़े परंतू तहसीलदार देवरे हे शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने नायब तहसीलदार निवेदन स्विकारण्यास पुढे आले होत़े प्रसंगी नर्मदा बचावतर्फे तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आल़े निवेदनात वनाधिकार कायदा 2006 चे पूर्ण पालन करा, सातपुडय़ातील नर्मदा खो:यातील आदिवासींना प्राधान्य द्यावे, वनाधिकार कायदयाच्या कलम 4 नुसार ज्यांच्या जमिनी नुकसान भरपाई न देता बुडालेल्या आहेत त्यांचा हक्क मंजूर करुन त्यांना पुनर्वसनाचे अधिकार द्यावेत, सर्वोच्च न्याच्या 2019 च्या 11 लाख आदिवासी कुटूंबांना अपात्र म्हणून जंगलातून विस्थापित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य शासनाने तात्काळ शपथपत्र दाखल करावे, वनजमिनीवर त्यांच्या काठी वसलेल्या गावातील ग्रामसभांद्वारे वनरक्षण, वनौपजावर आधारित उद्योग व मार्केटिंग यांचे नियोजन करण्यात यावे, मध्यम प्रकल्पांना विरोध करणा:या धडगाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या ठरावांनुसार  नर्मदेचे पाणी बोगद्यातून सातपुडय़ाखाली आणण्याचा प्रकल्प आदिवासी विरोधी असल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या़ निवेदनावर नूरजी वसावे, पुन्या वसावे, दिलवर वासवे, खेमसिंग पावरा, किना:या पाडवी, चेतन साळवे, लतिका राजपूत, किसन सिंगा वसावे, कालुसिंग पाडवी, कांतीलाल वसावे आदींच्या सह्या आहेत़ 

तहसीलदार देवरे हजर नसल्याने नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ते आणि आदिवासी विस्थापितांनी तहसीलदार यांच्या खुर्चीला घेराव घातला होता़ यावेळी त्यांनी विविध घोषणा दिल्या़ शासनाकडून मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी तहसील कार्यालयाबाहेर सुमारे दीड तासापेक्षा अधिक वेळ धरणे आंदोलन करण्यात आल़े