शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेला महिना म्हणजे श्रावण मास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

यंदा वरुणराजाही न बरसल्‍याने धरणांच्‍या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, काही भागात थोड्या फार प्रमाणात झालेल्‍या पावसामुळे हिरवाईने सारी ...

यंदा वरुणराजाही न बरसल्‍याने धरणांच्‍या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, काही भागात थोड्या फार प्रमाणात झालेल्‍या पावसामुळे हिरवाईने सारी सृष्‍टी बहरली आहे. त्‍यामुळे श्रावणाच्‍या आनंदात भर पडणार आहे. यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत. श्रावणमास म्‍हटला की, सणावाराचा व्रत-वैकल्‍यांचा महिना. तमाम हिंदू बांधव या महिन्‍यात ईश्‍वराची आराधना करण्‍यात गुंतलेले असतात. त्‍यातूनच येणाऱ्या विविध सणावारांचा आनंद लुटला जातो. यंदा १३ ऑगस्‍टला नागपंचमी असून, २२ ऑगस्‍टला भावा-बहिणीचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर आतापासून राख्‍यांची दुकाने सजू लागली आहेत. येत्‍या १७ ऑगस्‍टला मंगळागौर असल्‍याने खेळाच्‍या तालमी रंगू लागल्‍या आहेत. १९ ऑगस्‍ट रोजी मोहरम असून, मुस्लिम बांधवही त्‍याच्‍या तयारीला लागले आहेत. ३० ऑगस्‍टला श्रीकृष्‍णाष्‍टमी तर ३१ ऑगस्‍टला गोपाळकाला आहे. त्‍यामुळे तमाम श्रीकृष्‍ण मंदिरांमध्‍ये त्‍यादृष्‍टीने पूजाविधीच्‍या दृष्‍टीने तयारी सुरू आहे. ६ सप्टेंबरला पिठोरी अमावास्‍या अर्थात पोळा असून, त्‍याच्‍याही तयारीला बळीराजा लागला आहे. पोळ्यासाठी लागणारे साहित्‍य खरेदीची सुरुवात होणार आहे. आषाढ सरींची झड पडून गेलेली असते. त्‍यामुळे श्रावणात निसर्ग बहरलेला असतो. त्‍यात श्रावणसरींचा आनंद लुटत निसर्ग पर्यटनालाही बहर आलेला असतो. त्‍यामुळे अनेकांकडून त्‍यादृष्‍टीनेही नियोजन सुरू झाले आहे.

शासनाने अजूनही धार्मिक स्‍थळे उघडण्‍यास परवानगी दिलेली नाही. त्‍यामुळे श्रावणमासात मंदिरांमध्‍ये होणाऱ्या गर्दीला यावेळी चाप बसला आहे. श्रावण मासात विविध मंदिरांमध्‍ये भरगच्‍च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते; परंतु कोरोनामुळे सरकारने अद्यापही मंदिरे खुली करण्‍यास मान्‍यता दिलेली नाही. त्‍यामुळे पुजारी वर्गालाच केवळ पूजाविधीसाठी परवरनगी असणार आहे. श्रावणात यंदा मनाई असल्‍याने शिवभक्‍तांच्‍या आनंदावर विरजण पडणार आहे.