शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आता दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंतही दुकाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आॅरेंज झोनमधील नंदुरबार जिल्ह्याला दिलासा देणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आॅरेंज झोनमधील नंदुरबार जिल्ह्याला दिलासा देणारा निर्णय जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी जाहिर केला आहे़ नवीन निर्णयानुसार सकाळी आठ ते दुपारी १२ प्रमाणेच दुपारी चार ते सायंकाळी सात यावेळेत व्यावसायिकांना दुकाने सुरु ठेवता येणार आहे़जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी गुरुवारी दुपारी याबाबत आदेश पारित केले आहेत़ यानुसार जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व आस्थापना व दुकाने लॉकडाऊन कालावधीत सकाळी सात ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहणार आहेत़ ही शिथिलता १७ मे पर्यंत राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे़ दरम्यान लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किराणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरु राहणार आहेत़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत पूर्णवेळ सुरु राहणार आहेत़ तर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्या भागासाठी प्रतिबंधित नियम लागू राहतील. कुठल्याही कार्यालयास या वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना या आदेशामुळे आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.लॉकडाऊनला शिथिलता मिळाली असली तरी सोशल आणि फिजीकल डिस्टन्सिंग तसेच मनाई आदेश मात्र लागूच राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत़ हे सर्व निर्बंध केवळ १७ मेपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे़ दरम्यान ग्रामीण भागातील जीवन बºयापैकी सुरळीत झाले असून नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे़नागरिकांनी दुकानाच्या ठिकाणी गर्दी करू नये, दुकानात जाताना व खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, चेहºयावर मास्कचा वापर करावा, दुकाने व आस्थापनांनी देखील कोरोबाबतच्या नियमांचे पालन करावे, सॅनेटायझर सुविधा करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़ वेळोवेळी तालुका स्तरावर तहसीलदार व प्रशासनातील अधिकारी बाजारपेठेत भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत़ नंदुरबारसह जिल्ह्यातील चार पालिका क्षेत्र, १ नगरपंचायत व १ शहरी ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाबाबत करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती व्यावसायिकांना देण्यात आली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश शुक्रवारी सकाळपासून अंमलात येणार आहेत़ यातून देशी व विदेशी मद्याची दुकाने ही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत सुरु राहणार आहेत़होम डिलीव्हरी करणारे रेस्टॉरंटला परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे़ शुक्रवारपासून सोशल आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करुन खाद्यपदार्थ विक्रेते विक्री करु शकतील असा अंदाज आहे़१७ रोजी लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होत असला तरी त्याच्या दोन दिवस पूर्वी जाहिर करण्यात आलेला हा निर्णय लॉकडाऊन संपण्याच्या पूर्वतयारीचे संकेत मानले जात आहेत़ व्यावसायिकांना सूट मिळणार असली तरी कोविड-१९ च्या नियमावलीतील नियमांचा भंग झाल्यास तातडीच्या कारवाईची टांगती तलवार राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे़४येत्या दोन दिवसातील जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रशासनाकडून १८ मेपासून महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस सेवेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यादृष्टीने तयारीवर भर देण्यात येत असल्याची माहिती आहे़ जिल्ह्यातील चारही आगारातून परप्रांतीय मजूरांना सोडणे तसेच येथून स्थलांतरीत मजूरांना परत आणण्यासाठी बसेसचा वापर सुरु आहे़ गुरुवारी दिवसभरात मजूरांना सोडण्यासाठी ७० बस फेºया पूर्ण झाल्या आहेत़ यामुळे बसस्थानके सुरु होण्याची अधिक शक्यता आहे़येत्या काळात सार्वजनिक उत्सव, खाजगी समारंभ, विवाह सोहळे यासह विविध कार्यक्रम मात्र प्रशासनाच्या परवानगीनेच होणार असल्याचे समजते़