शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीतून सहभागी शिवप्रेमींचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवजयंतीचे औचित्य साधून नंदुरबार शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिवजयंतीचे औचित्य साधून नंदुरबार शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत विविध मान्यवरांसह शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक व महिलांनी सहभाग घेतला़ यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने शहर दणाणले होते़शहरातील जुनी नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सायंकाळी रॅलीला प्रारंभ करण्यात आला़ रॅलीत सात व्यायाम शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला होता़ त्यांच्याकडून ट्रॅक्टरवर शिवप्रतिमा तसेच मूर्ती ठेवून सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले़ बालशिवाजी, राज्याभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्यासह विविध चित्ररथही रॅलीत समाविष्ट करण्यात आले होते़ माळीवाड्याचा राजा व्यायामशाळा, मारुती व्यायाम शाळा, सुवर्ण युवा शक्ती ग्रुप, शिवजयंती महाराष्ट्र व्यायाम शाळा, रायसिंगपुरा व्यायाम शाळा यांनी रॅलीत सहभाग नोंदवला होता़उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा़ डॉ़ रविंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र जैन, भाजपाचे पालिका गटनेते अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रविण गुरव, अर्जुन मराठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़शहरातील जुनी नगरपालिका येथून नेहरु पुतळा, महात्मा गांधी चौक, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, मोठा मारुती मंदिर या मार्गाने रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराजवळ समारोप करण्यात आला़ रॅलीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़शिवजयंतीच्या उत्साहातही उपस्थित शिवप्रेमींनी कोरोनाच्या जनजागृतीकडे लक्ष देत नागरिकांचे प्रबोधन केले़ चित्र रथांसोबत चिमुकले बालक आणि विद्यार्थ्यांनी रॅलीत कोरोनाबाबत संभ्रम निर्माण करुन अफवा पसरवू नका असे आवाहन केले़ चिमुरड्यांच्या या प्रयत्नाला उपस्थित मान्यवरांकडूनही दाद देण्यात आली़