शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला डीजे वाजवल्याने मंडळांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवजयंतीला विनापरवाणगी डीजे लावणे व क्षमतेपेक्षा अधीक आवाज ठेवल्याप्रकणी सहा तालीमसंघ आणि डीजे मालकांविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिवजयंतीला विनापरवाणगी डीजे लावणे व क्षमतेपेक्षा अधीक आवाज ठेवल्याप्रकणी सहा तालीमसंघ आणि डीजे मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये खळबळ उडाली आहे.नंदुरबारात १२ मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सहा तालीमसंघ व मंडळांनी डीजे लावून मिरवणुका काढल्या होत्या. मिरवणुकांमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियमाद्वारे नेमून दिलेल्या तीव्रतेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला. शिवाय स्थानिक रहिवासी आणि शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन ईजा होईल अशी कृती केली. पोलीस अधिकारी व कर्मचारी सांगण्यास गेले असता त्यांच्याशी हुज्जत घातल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.फौजदार सुनील बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून विरभगतसिंग व्यायाम शाळाचे अध्यक्ष संदीप चौधरी व वाहन धारक, डीजे मालक रिंकू गोसावी, आॅपरेटर भूषण पाटील यांच्याविरुद्ध.जमादार सुभाष ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक रमण शिंदे आणि डीजे मालक.जमादार राजेंद्र बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून मारुती व्यायाम शाळेचे अध्यक्ष गिरीष पावबा मराठे यांच्याविरुद्ध. हवालदार रवींद्र पवार यांच्या फिर्यादीवरून नवजीवन व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल रमेश परदेशी यांच्याविरुद्ध.हवालदार गणेश दगडू धनगर यांच्या फिर्यादीवरून दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश अरुण सोनार यांच्याविरुद्ध व पोलीस नाईक दिपक रामभाऊ गावीत यांच्या फिर्यादीवरून वीर छत्रपती ब्रिगेड मंडळाचे अध्यक्ष खुशाल जगदीश चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.