शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकार समितीकडे शिर्वे ग्रामस्थांचे गाºहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाचे राष्टÑीय मानवाधिकार आयोगाचे पथक जिल्ह्यात दाखल झाले़ पथकाने बुधवारी सायंकाळी शिर्वे ता़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्र शासनाचे राष्टÑीय मानवाधिकार आयोगाचे पथक जिल्ह्यात दाखल झाले़ पथकाने बुधवारी सायंकाळी शिर्वे ता़ तळोदा येथे दिली़ यावेळी ग्रामस्थांनी विविध शासकीय व वैयक्तिक लाभाच्या योजनांचे गाºहाणे मांडले़ समितीने ग्रामस्थांचे ऐकून घेत संबंधीत यंत्रणांना सूचना केली करुन अहवाल देण्याचे द्यावा अन्यथा कारवाई करण्याचे सुतोवाच केले़केंद्र शासनाचे राष्टÑीय मानवाधिकार आयोगाचे पथक दौरा ११ ते १३ मार्च दरम्यान नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले आहे़ दौºयात हे पथक केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व त्याचा लाभार्थींना प्रत्यक्ष दिला जाणारा लाभ याची पडताळणी करणार आहे़ पथकाने बुधवारी जिल्ह्यात पाऊल ठेवल्यानंतर प्रथम तळोदा तालुक्याला प्राधान्य देत भेटीचे नियोजन केले़ यात तालुक्यातील शिर्वे येथे प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांसोबत संवाद साधला होता. यात ग्रामस्थांनी एकाही शेतकºयाला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेली नसल्याची तक्रार करुन काहींना एक हप्ता मिळाला तर काहींना एकही मिळाला नाही, असे सांगून आॅनलाईन कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ घरकुलाची रक्कमदेखील आॅनलाईनच्या अडचणीमुळे वेळेवर मिळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ त्यामुळे घरकुलांची कामेदेखील रखडले असल्याची माहिती देण्यात आली़ रोहयोची कामे, संजय गांधी योजनेच्या पैशांबाबतही फिरवाफिरव केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला़ रेशनमाल, शौचालये या प्रकरणीही दखल घेण्याची मागणी त्यांनी केली होती. संबंधीत पथकातील अधिकाऱ्यांनी गावकºयांच्या तक्रारी ऐकूण घेतल्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधीत यंत्रणातील अधिकाºयांना दिल्या. कार्यवाहीचा अहवालदेखील तातडीने पाठविण्यात यावा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावकºयांनी सुद्धा आपल्या समस्या सुटल्या नसतील तरी पथकाकडे पत्रव्यवहार करण्याची सूचना देण्यात आली आहे. एकूणच या पथकास शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यापेक्षा तक्रारीच अधिक ऐकावयास मिळाल्या. त्यामुळे पथक कोणती भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, गट विकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार रामजी राठोड, श्रीकांत लोमटे आदी उपस्थित होते.४पथकाच्या भेटीप्रसंगी सर्व यंत्रणांना उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून आधीच देण्यात आल्या होत्या. तरीही महसूल, पंचायत समिती व आदिवासी विकास प्रकल्प या तीन विभागा व्यतिरिक्त इतर विभागांनी नेहमीप्रमाणेच दांडी मारल्याचे सांगण्यात आले. पथकाच्या दौºयाबाबत उपस्थितीची सूचना दिलेली असतांना त्याबाबत गांभीर्याने घेण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान पथकाने गावातील शासकीय आश्रम शाळेसदेखील भेट दिली होती. या वेळी त्यांनी मुलांची निवास व्यवस्था, स्रानगृह, शौचालये, भोजन गृह आदींची पाहणी केली. काही ठिकाणी असमाधान कारकता आढळून आल्याने सुधारणा करण्याचा सूचना दिल्या. या वेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते. पथक निघून गेल्यानंतर प्रकल्पाचे अधिकारी तेथे पोहोचल्याचे सांगण्यात आले.