शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

बोलक्या भिंतीआड बालभवितव्याला आकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माता भगिनींसह ग्रामस्थांच्या सहकार्यातून पूनर्वसित रेवानगर ता. तळोदा येथील अंगणवाडीच्या बोलक्या भिंती साकारण्यात आल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माता भगिनींसह ग्रामस्थांच्या सहकार्यातून पूनर्वसित रेवानगर ता. तळोदा येथील अंगणवाडीच्या बोलक्या भिंती साकारण्यात आल्या आहे. या भिंतीमुळेच अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या वाढली असून तेथे कृषी, व्यापार, पर्यावरण व सांस्कृतिकदृष्ट्या प्रतिभावंत बालक घडविले जात आहे.गाव तथा देश विकासातील पहिली पातळी ठरणाºया अंगणवाडी केंद्राचे रुप बदलून बालकांमध्ये अंगणवाडीबद्दल आवड निर्माण करण्यासाठी रेवानगर अंगणवाडी केंद्र क्र.४ येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. तेथील अंगणवाडी सेविका सुनिता पोपट पावरा व मदतनीस कागीबाई वंसत पावरा हे अंगणवाडी विकासासाठी दर १५ दिवसांनी गावातील माता, किशोरवयीन मुली व ग्रामस्थांची बैठक घेत आहे. या बैठकीत माता व मुलींच्या विकासासह आहाराबाबत चर्चा केली जात असली तरी प्रतिभावंत बालक घडविण्यासाठी अधिक भर दिला जातो. योजना राबवितांना अडचण आल्यास ग्रामस्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदतीला येतात. त्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी या कर्मचाºयांना फारशी झळ पोहोचत नाही.ग्रामस्थांच्या मदतीनेच बोलक्या भिंती साकारण्यात आल्या टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम राबवत माता, किशोरी मुली व ग्रामस्थांच्या मदतीनेच अनेक वस्तूही तयार करण्यात आल्या आहे. त्याद्वारे केंद्रातील बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीबद्दल बालकांमध्ये गोडी निर्माण झाली असून नियमित उपस्थित राहणाºया बालकांच्या संख्येत भर पडली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून प्रतिभावंत बालक घडविण्यावर विशेष भर दिला जात असून अंगणवाडी नव्हे बालसंस्कार केंद्र असल्याचेही पालकांमधून म्हटले जात आहे.बाजारपेठेतील धान्य व्यापारावर माहिती देत खाद्य संस्कृतीवर मार्गदर्शन करण्यात येत असल्याने या बालकांना आहार तथा पोषणाबाबतही अप्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे. चित्रांच्या माध्यमातून जंगल साकारत जंगली प्राणी व वनातील झाडे झुडूपांची देखील ओळख करुन दिली जात आहे. त्यामुळे बालकांमध्ये प्रगल्भता वाढीस लागत असल्याने पालकांमधून या कर्मचाºयांचे कौतुक होत आहे.