शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शबरी घरकुल योजनेचा प्रस्ताव पडला धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी तळोदा पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टानुसार तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. परंतु त्या प्रस्तावावर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नही. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्तपणे राबविल्या जाणाºया प्रधानमंत्री घरकुल योजनेशिवाय आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्रपणे शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ही राज्य शासनाची योजना असून हक्काचे घर नसलेल्या आदिवासी कुंटुंबांना या योजनेतूनही घर उपलब्ध करुन दिले जात आहे. या योजनेतून घरकुल देण्यासाठी तळोदा पंचायत समितीला आदिवासी विकास विभागामार्फत १९० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.दिलेल्या उद्दिष्टानुसार पंचायत समितीने आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावावर प्रकल्प कार्यालयामार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. पुढे पाठपुरावा करण्यात आला असतांना निवडणुका कालावधी असल्यामुळे कुठलेही कामकाज झाले नसल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात आले. मात्र निवडणूक कालावधी उलटून महिनाभराचा कालावधी झाला असूनही त्यावर कुठलीच ठोस कार्यवाही झाली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समितीत वारंवार फेºया माराव्या लागत असून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. बेघरांना वेळेवर घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रकरणे तातडीने मंजूर करीत लाभार्थ्यांना पंचायत समितीकडे माराव्या लागणाºया फेºया बंद करीत त्यांना न्यायही देण्याची मागणी होत आहे.तळोदा तालुक्यात अनुसूचित जमातीच्या बांधवांचेच अधिक वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतांश कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. तर काही काहींना शबरी योजनेमधूनच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिवाय नवीन लग्न झालेल्या कुटुंबियांपैकी अनेकांना अद्याप हक्काचे घरकुल उपलब्ध झाले नाही. त्यांना या दोन्ही योजनेतून घरकुल देण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहे. परंतु या बेघरांकडून सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना योजनेची प्रतिक्षा लागली आहे.