शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांच्या दुर्दैवी मृत्यूने सुंदरपूरवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तालुक्यात तापी नदीच्या बॅकवॉटर मंगळवारी सायंकाळी मध्ये बोट उलटल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तालुक्यात तापी नदीच्या बॅकवॉटर मंगळवारी सायंकाळी मध्ये बोट उलटल्याने 13 जण बुडाले होते. त्यापैकी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणा:यांनी लोकांनी पाच जणांचे प्राण वाचवले. उच्छल येथील भारतीय स्टेट बँकत कर्मचारी असलेले राजेश कोकणी यांच्या कुटूंबातील चार सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला. इतर तीन जणांचाही त्यात समावेश आहे. पाण्यात बुडालेल्या एकाचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती उच्छल पोलिसांनी दिली.  नवापुर शहरापासुन पाच कि.मी. अंतरावर असलेल्या सुंदरपुर येथील रहिवाशी व भारतीय स्टेट बॅकेच्या उच्छल शाखेत शिपाई असलेले राजेश बाळिराम कोकणी व अन्य 12 जण मंगळवारी दुपारी जवळच्या वंजारी येथुन ऊकाई धरणाच्या साठलेल्या पाण्यातुन दोन बोटीने पलिकडे सहलीसाठी गेले. पलिकडच्या तीरावर काही काळ थांबल्यावर दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांनी परततांना एकच बोट घेतली. वा:याचा प्रचंड वेग असल्याने परतणारी बोट हेलकावे घेउ लागल्याने लहान बालके घाबरलीत. त्यांना धीर देत संयम राखण्याचे सांगण्यासाठी राजेश कोकणी व अन्य ज्येष्ठ सदस्य उभे राहुन प्रय} करतांना बोटीचा तोल गेला व बोट उलटली. वंजारी ते पलिकडचे अंतर एक कि.मी. पेक्षाही कमी आहे.  जवळच मासेमारी करणारे व वंजारी गावातील काहींनी धाव घेतली. मात्र त्याचा उपयोग होउ शकला नाही. अपघातात विनोद बुधिया कोकणी (18), उर्मिला रतू कोकणी (20), आराध्या सुकलाल कोकणी (वय सात), एंजल्स डेविड कोकणी (वय पाच), अंजना राजेश कोकणी (14) अभिषेक राजेश कोकणी (12) व राकेश बळीराम कोकणी (32) रा. सुंदरपूर ता.उच्छल जिल्हा तापी गुजरात यांचा मृतांमध्ये समावेश आहे.विकास राजू गामित (20), दिनेश देवाजी वळवी (28) रा वणझारी ता.उच्छ्ल, सुमित पारध्या गामित (22) रा भींतखुद ता.उच्छ्ल, जिग्नेश नारू कोकणी (20), याकुब भीमसिग कोकणी (28) रा.सुंदरपूर यांना वाचविण्यात यश आले होते. तापी जिल्हा पोलीस अधिक्षक एन. एन. चौधरी, उच्छलचे पोलीस निरिक्षक एन. ङोड. भोया व महसुल तथा इतर विभागांचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकुन होते. दुस:या दिवशीही एकाचा शोध सुरू होता. सुंदरपुर गावात या घटनेमुळे शोकाकळा पसरली आहे.