जय भगवान महसंघाचे संस्थापक व व्हीजेएनटी व ओबीसींचे नेते बाळासाहेब सानप यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. महासंघाची बैठक महेंद्र चकोर यांच्या घरी पार पडली. बैठकीत जय भगवान महासंघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र रमेश चकोर, नंदुरबार संपर्क प्रमुख योगेश गाभणे व युवा जिल्हा अध्यक्ष नवनाथ नागरे, महाप्रवक्ता स्वामी घुगे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शिंत्रे, तालुका उपाध्यक्ष हेमंत नागरे यांचा सत्कार प्रा.नरेंद्र नागरे यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वांनी एकजूट होऊन समाजाचे काम करावे, गोरगरीब लोकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी गावात ग्रंथालय यासह विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन स्वामी घुगे यांनी केले. कार्यक्रमास जय भगवान महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या काही दिवसात राहिलेल्या पदांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST
जय भगवान महसंघाचे संस्थापक व व्हीजेएनटी व ओबीसींचे नेते बाळासाहेब सानप यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. महासंघाची बैठक ...
जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}