शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बाधिताच्या हातावर आता मारणार शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

नंदुरबार : रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या हातावर बाधिताचा शिक्का मारला जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले ...

नंदुरबार : रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या हातावर बाधिताचा शिक्का मारला जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत कोरोना नियंत्रणाबाबत विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.भारुड म्हणाले, रॅपिड अँटिजन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या हातावर शिक्का मारून त्यांच्यावर अलगीकरणात उपचार करण्यात यावे. घरी थांबण्याचा आग्रह धरणाऱ्या बाधित व्यक्तीचे समुपदेशन करण्यात यावे. अशी व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल होत नसल्यास दंडात्मक कारवाई करावी.

रेल्वेतील अलगीकरण कक्षात पुरुष बाधित तर तापी महिला वसतिगृह येथे महिला बाधितांची सोय करण्यात यावी. एकलव्य कोविड केअर सेंटर येथे कुटुंबाची व्यवस्था करण्यात यावी. गाव आणि वॉर्डनिहाय लसीकरणासाठी नियोजन करण्यात यावे. यासाठी शिक्षण विभागाने पात्र व्यक्तींच्या याद्या तयार कराव्या.

जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठी नवीन यंत्र प्राप्त झाले असून, ते तत्काळ सुरू करावे. शासकीय विश्रामगृह येथे शासनाकडून नव्याने नियुक्त होणारे वैद्यकीय अधिकारी आणि मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी कक्ष आरक्षित ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत रुग्णवाहिकेचा उपयोग, कोविड केअर सेंटरमधील सुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली.