शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

डोंगऱ्यादेव विद्यालयात स्काऊट-गाईड शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोकणीपाडा येथील डोंगºयादेव माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोकणीपाडा येथील डोंगºयादेव माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा स्काऊट-गाईडचे सहाय्यक आयुक्त प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण अहिरे, केंद्रप्रमुख एस.एन. पाटील, सरपंच अनिता गांगुर्डे, शाळेचे मुख्याध्यापक कुंदन सोनवणे उपस्थित होते.शिबिराचे ध्वजारोहण पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, स्काऊट व गाईड हा विषय जीवन मूल्य शिकवणारा महत्वाचा विषय असून, त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. केंद्रप्रमुख एस.एन. पाटील यांनीही जीवन कौशल्य, मूल्यशिक्षण आणि स्काऊट-गाईड यांची सांगड घालून मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक कुंदन सोनवणे, किर्तीवर्धन तायडे, वसंत वळवी व महेंद्र चौरे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रात्रीच्याप्रसंगी शेकोटी, गाणे, कविता असा कार्यक्रम झाला.तंबू सजावट, स्वयंपाक, स्लो सायकलिंग, गोणपाटात धावणे, निंबू-चमचा, तीन-पाय शर्यत, फणी गेम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोनदिवसीय निवासी शिबीरात विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षण व जीवनकौशल्यावर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात आले.शिबीरासाठी स्काऊट शिक्षक चंद्रमणी बरडे, मुख्याध्यापक कुंदन सोनवणे, पी.एम. साळुंके, राजेश गांगुर्डे, जितेंद्र गिरासे, महेंद्र चौरे, किर्तीवर्धन तायडे, योगेश कोकणी, वसंत वळवी, नरेश कदमबांडे, दशरथ घुगे, राजू वळवी यांनी परिश्रम घेतले.