‘सुदृढ आरोग्या’च्या हक्कासाठी सरसावल्या शालेय विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:33 AM2019-12-11T11:33:38+5:302019-12-11T11:33:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘माझा अधिकार आरोग्याचा, तंबाखुमुक्त परिसरा’चा या घोषणांसह देत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात ...

Schoolchildren Moved to Promote 'Healthy Health' | ‘सुदृढ आरोग्या’च्या हक्कासाठी सरसावल्या शालेय विद्यार्थिनी

‘सुदृढ आरोग्या’च्या हक्कासाठी सरसावल्या शालेय विद्यार्थिनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘माझा अधिकार आरोग्याचा, तंबाखुमुक्त परिसरा’चा या घोषणांसह देत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे़ यामुळे तंबाखूमुक्तीसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी शालेय विद्यार्थिनींनी केली़ मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून तब्बल दहा विद्यार्थिनींच्या गटाने जिल्हाधिकारी व अधिकाºयांना निवेदन देत तंबाखुजन्य पदार्थांवर बंदीची मागणी केली़
मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा प्राधिकरण नंदुरबारचे न्यायाधिश सतिष मुळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जिल्हा शल्यचिकित्सक रघुनाथ भोये, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, शिक्षण विभाग उपनिरीक्षक दिनेश देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले़ साक्षी पाटील, उन्नती कलाल, भाग्यश्री गवळी, आर्या पाटील, मातंगी बनकर या विद्यार्थिनींनी हे निवेदन देत राज्यातील तिसरा तंबाखुमुक्त जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात तंबाखु जन्य पदार्थांमुळे व्यसन करणाºयांसह इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे़ यातून अनेकजण सुदृढ आरोग्याचा अधिकार गमावून बसले आहेत़ मानवी हक्क दिनी त्यांना सुदृढ आरोग्य हक्क देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी केली़
मुंबई सलाम फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबण्यात आला़ वरिष्ठ व्यवस्थापक अजय पिळणकर, मुख्याध्यापिका सुषमा शहा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत बागूल, तंबाखूमुक्त नंदुरबार जिल्हा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवी गोसावी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थिनींने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी संवाद साधून त्यांच्या धाडसाचे कौतूक करत मार्गदर्शन केले़

Web Title: Schoolchildren Moved to Promote 'Healthy Health'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.