शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : योजनेअंतर्गत जिल्ह्यात १६^ हजार शेतकऱ्यांकडील चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : योजनेअंतर्गत जिल्ह्यात १६^ हजार शेतकऱ्यांकडील चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या कापसाची किंमत २२९ कोटी तीन लाख ४३ हजार एवढी आहे.
कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदीला वेग देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी देखील याबाबत निर्देश दिले होते. लॉकडाऊनपूर्वी केवळ दोन लाख ९७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. लॉकडाऊननंतर तांत्रिक अडचणींमुळे व आवश्यक कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने खरेदी प्रक्रीया काही काळ थांबली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी तांत्रिक अडचणी दूर करून खरेदी प्रक्रीया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी कापूस खरेदी केंद्रालाही भेटी दिल्या. लॉकडाऊन कालावधीत खरेदी प्रक्रया सुरू झाल्यानंतर सुमारे साडे चार हजार शेतकºयांकडील एक लाख २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याची एकूण किंमत ६७ कोटी ५४ लाख रुपये आहे.
सीसीआयच्या माध्यमातून सर्व शेतकºयांकडील कापूस खरेदी करण्यात आली असून नंदुरबार तालुक्यातील सात हजार ४४ शेतकºयांकडील एक लाख ७० हजार १८९ क्विंटल, नवापूर तालुक्यात ७०१ शेतकºयांकडील २४ हजार ४४२ क्विंटल आणि शहादा तालुक्यातील आठ हजार २६० शेतकºयांकडील दोन लाख ३० हजार क्विंटल असे एकूण १६ हजार पाच शेतकºयांकडील चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. परंतु नंतर ती सुरू करण्यात आली. शेतकºयांकडील कापसाचे पंचनामे करून त्यांची नोंदणी करून सर्व कापूस खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. दरवाढ होईल या आशेने शेतकºयांनी कापूस घरातच ठेवला होता. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले होते.