शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाचा ‘बांबू’पासून वाढता दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दैनंदिन वापरासाठी असलेल्या अगदी छोटय़ाच्या वस्तूंपासून घर बांधण्यार्पयत प्रत्येक बाबींमध्ये बांबूचा वापर केला जातो. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दैनंदिन वापरासाठी असलेल्या अगदी छोटय़ाच्या वस्तूंपासून घर बांधण्यार्पयत प्रत्येक बाबींमध्ये बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे सातपुडय़ातील आदिवासी बांधवांसाठी बांबू हा अविभाज्य घटक ठरतो. परंतु आधुनिकतेमुळे या पारंपरिक जीवनपद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत आहे. ही बाब या संस्कृती सेवर्धनासाठी बाधक असल्याची खंत तेथील ज्येष्ठांकडून व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, अशाच वस्तुंसह अन्य बाबींचा अवलंब करणारा सातपुडय़ातील आदिवासी बांधव परंपरेनुसार त्यांच्या जीवनात बांबूपासून निर्मित सर्वाधिक वस्तू वापरत आला आहे, बांबूलाच अधिक महत्व दिले गेले आहे. म्हणूनच आदिवासींची नाळ निसर्गाशी जुळत असल्याचे म्हटले जाते. ही जीवन पद्धती समाजजीवनात वेगळा ठसा उमटवत असून याच पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे मत सातपुडय़ातील ज्येष्ठांमार्फत व्यक्त केले जात आहे. परंतु आधुनिकतेमुळे या पद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत असल्याची खंतही ज्येष्ठांमार्फत व्यक्त केली जात आहे. बांबूचा झाडू-खराटापासून घर उभारणे, धान्याच्या कोठय़ा, कडबा साठवण्यासाठी कोठार, विविध प्रकारच्या टोपल्या, पारंपारिक वाद्ये, मासे मारण्याची साधने यासह अनेक साहित्य बनविले जात आहे. त्याचा धागा म्हणूनही वापर होत असल्याने त्यांच्यासाठी बांबू ही वनस्पती जीवनातील अविभाज्य घटक ठरते. पशुधनाला वर्षभर पुरेल इतका कडबा विविध पिकांपासून तयार केला जातो. परंतु मर्यादित घरांमुळे बहुतांश पशुपालक बांबूपासून कोठार तयार करीत त्यात कडबा साठवत असतात. त्याला सातपुडय़ातील बोलीभाषेत ‘हाटा’ असे म्हटले जाते. हे कोठार पूर्णत: बांबूपासून तयार केले जात असून त्यात पावसाचे पाणी जाऊ नये, वादळ - वा:यातही सुरक्षीत राहावे, यासाठी त्याला विशिष्ट आकार दिला जातो. त्यामुळे त्यात साठवलेला चारा अथवा कडबा वर्षभर काहीही होत नाही. खेळती हवा राहत असल्याने कडब्याला बुरशीही लागत नाही. हे तंत्रज्ञान सातपुडय़ातील आदिवासींना एखाद्या तज्ञाने शिकवले नसून ही पूर्वजांची देणगी ठरते. पहाडातील जीवन पद्धतीतील अन्य काही घटकाच्या दृष्टीनेही असेच म्हटले जात आहे. पूर्वजांचे हे ज्ञान आताच्या आदिवासींनी घेतले नाही. शिवाय आधुनिकतेमुळे त्याला पर्यायी साधने उपलब्ध होऊ लागल्यामुळे आदर्शवत असूनही या पद्धतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे सातपुडय़ात या कोठारांचे  अत्यल्प प्रमाण दिसून येत आहे. या पद्धतीपासून आताचा आदिवासी बांधव दुरावत चालल्यामुळे ही पद्धतच कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. येत्या कालावधीत यातील काही भाग लोप पावलेला असेल. याबाबत आताच्या शिकणा:या मुलांच्या मानसिकतेवर ज्येष्ठांकडून खंतही व्यक्त केली जात आहे. 

घराचा कुड हा बांबूपासून तयार केला जात असून या कुडामुळे घरात कुठल्याही वातानुकुलीत विद्युत उपकरणांची आवश्यकता भासत नाही. शिवाय सुर्य उगवणे व मावळण्याचा अचुक अंदाजही कुडामुळे घेता येतो, घडय़ाडाचा फारसा अवलंब होत नाही. घरातला माळा पूर्णत: बांबूचा असून छत हे कौले, आधारासाठी दांडय़ासह बांबूपासूनच तयार केले जाते. तर घर बांधण्यासाठी दोरचा वापर न करता बांबूपासून काढलेल्या बातळी धागाच वापरला जातो. त्यामुळे घर मजबूत राहत असून घराचे साहित्य वाटेल तेव्हा काढता येते , त्यामुळे हे घर पूर्णत: पर्यावरणपुरक ठरते.

आज असंख्य आदिवासी शिकून मोठ-मोठय़ा पदांवरील जबाबदा:या सांभाळत आहे, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु हे केवळ आधुनिक शिक्षणच घेत गेले. पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बाबी आदर्श असूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शिकले असले तरी पारंपरिक ज्ञानाबाबत ते अज्ञानच असल्याचे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहे