शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडी होळीच्या रंगात सातपुडा ‘सप्तरंगी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:45 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगातील मनुष्यासह, प्राणीमात्र, झाडे, पक्षी यांच्यासह सर्वच जीवजंतूंवर होळी आईने कृपा ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगातील मनुष्यासह, प्राणीमात्र, झाडे, पक्षी यांच्यासह सर्वच जीवजंतूंवर होळी आईने कृपा कायम ठेवावी अशी प्रार्थना करत काठीची राजवाडी होळी पेटवण्यात आली़ यावेळी ढोल, मांदल, बिरी आणि बावा बुध्या यांच्या कंबरेला बांधलेल्या तुंबड्यातून निघणाऱ्या स्वरांनी संपूर्ण सातपुडा दुमदुमत होता़९०० वर्षांपासून अधिकची परंपरा असलेल्या राजवाडी होळीनिमित्त सोमवारी दुपारपासूनच काठी गावाकडे सातपुड्यासह नंदुरबार जिल्हा तसेच राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची पावले वळली होती़ राजवाडी होळीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मुख्य चौकात बावा, बुध्या, ढाणका यांच्या विविध पथकांनी नृत्याला सुरुवात केली होती़ डफ, मांदल, पारंपरिक ढोल यांच्या सुंदर स्वरांनी सायंकाळपासून रंगत आणली होती़ राजवाडी होळीसाठी पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड़ सीमा वळवी, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माजीमंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सदस्य सीक़े़पाडवी, धुळे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, यांच्यासह विविध मान्यवर याठिकाणी हजर झाले होते़ दरम्यान जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी हे ही रात्री उशिरापर्यंत काठी येथे थांबून होते़ रात्री उशिरापर्यंत मान्यवरांनी सुरु असलेला मेलादा आणि नृत्य पथकांच्या भेटी घेत त्यांचा उत्साह वाढवला होता़ काठीची राजवाडी होळी पाहता यावी यासाठी काठी गावातील चौकापासून लगतच असलेल्या गायत्री माता टेकडीवर शेकडोंच्या संख्येने महिला, पुुरुष आणि लहान बालके रात्रभर बसून होळीनृत्याची रंगत अनुभवत होते़ वातावरणा गारठा निर्माण होऊन रात्रभर महिला याच ठिकाणी बसून होत्या़ उत्सावाच्या पार्श्वभूमीवर काठी येथे मेलाद्याचे आयोजन करण्यात आले होते़ यात खाद्यपदार्थ, खेळणी, मनोरंजनाची साधने, पाळणे आदींचा समावेश होता़ होळीमातेला अर्पण करण्यासाठी संत्रे, गूळ, दाळ्या, हारकंगन यांचीही दुकाने याठिकाणी सजली होती़ रात्रभर सुरु असलेल्या या मेलाद्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली़पहाटे सहा वाजता होळीचे मानकरी काठी संस्थानचे वारसदार पृथ्वीसिंग पाडवी यांच्याहस्ते होळी पूजन करुन पेटवण्यात आली़ तत्पूर्वी पुजारांच्या हस्ते विधिवत पूजन करुन होळीमातेची आराधना करण्यात आली़ यावेळी स्थानिक बोलीभाषेत पुजारांनी ‘होळी माते सर्वांनाच सुखी ठेव’ अशी प्रार्थना होळी पेटवण्याची सूचना केली़ सुमारे ७० फुटांच्या उंच बांबूच्या शेंड्यावर खोबरे, पाच भाकरी, हारकंगन आदी लावून सजवण्यात आले होते़ होळी प्रज्वलित केल्यानंतर उंच बांबूचा दांडा पूर्व दिशेला कोसळल्यावर उपस्थितांनी धाºयाच्या सहाय्याने शेंड्याचे तुकडे करत उपस्थितांना होळीच्या प्रसादाचे वाटप केले़पहाटे होळी पेटल्यानंतर उशिरापर्यंत काठी येथून घराकडे परतणारे आदिवासी बांधव, महिला राख गोळा करुन घरी घेऊन जात असल्याचे दृश्य नजरेस पडत होते़