शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

मास्कबाबतच्या जागृतीमुळे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

धुळीमुळे नागरिक होताहेत त्रस्त नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट फाटा परिसरात रस्ता काम सुरू आहे. या रस्ता ...

धुळीमुळे नागरिक होताहेत त्रस्त

नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट फाटा परिसरात रस्ता काम सुरू आहे. या रस्ता कामावर उडणारी धूळ सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत कारवाई करण्याची अपेक्षा असून, धुळीमुळे दुचाकीस्वार त्रस्त आहेत.

भाजीपाला आवक मंदावली

नंदुरबार : उन्हाळा सुरू झाला असल्याने तालुक्यातून होणारी भाजीपाला आवक मंदावली आहे. तालुक्यातील अनेक भागांत भाजीपाला शेतीचा हंगाम आटोपत आहे. नवीन लागवड येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. परिणामी भाजीपाला आवक मंदावली असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांनंतर आवक पूर्ववत होण्याचा अंदाज आहे. आवक कमी झाल्याने दरांमध्येही काहीअंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ग्रामीण भागात घेतली जातेय दक्षता

रांझणी : तळोदा तालुक्यात कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी ग्रामस्थ दक्षता घेत आहेत. मास्कचा वापर तसेच घरी परतल्यावर हात धुणे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण हद्दीत कोरोनाने शिरकाव केल्याने दक्षता घेत ग्रामस्थ स्वत:ची काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे.

खासगी वाहनांच्या तपासणीची गरज

नंदुरबार : दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याची गरज आहे. यातील अनेक वाहने २० वर्षांपेक्षा अधिकच्या काळाची आहेत. या वाहनांचा प्रवास हा घाटामधून अधिक असल्याने त्यांची तपासणी आवश्यक आहे.

दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कार्यवाही करा

धडगाव : तळोदा तालुक्यातील रोषमाळ येथे तीव्र पाणीटंचाई असल्याचे समोर आल्यानंतरही तातडीने कार्यवाही करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने पावले उचललेली नाहीत. यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धडगाव पंचायत समितीकडून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे आणि पाडे यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे; परंतु यावर कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

रसवंतिगृहे सुरू

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात रसवंतिगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. हंगामी व्यवसाय असला तरी त्यातून रोजगार मिळत असल्याने अनेक जण रसवंतिगृहे चालवितात. साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत ही रसवंतिगृहे ऐनभरात चालत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डिस्टन्सिंग हवे

नंदुरबार : परराज्यातील परिवहन विभागाच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या बसेसच्या चालक व वाहकांना सूचना देत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. खासकरून मध्य प्रदेशातून येणाऱ्या बसेसमध्ये सूचना करण्याची गरज आहे.