शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अक्कलकुवा तालुक्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे़ यामुळे सातपुड्यात उगम पावणारे नदी नाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे़ यामुळे सातपुड्यात उगम पावणारे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत़ तब्बल दीड महिना दडी मारणाऱ्या पावसाने संततधार हजेरी लावली लावल्याने सातपुड्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे़अक्कलकुवा परिसरासह तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ दरम्यान संततधार पावसामुळे गारठा निर्माण झाला असून सातपुड्यात दाट धुके पसरत आहे़ धबधबे ओसंडून वाहू लागले असल्याने पर्यटकही आकर्षित होवून मोलगी व डाब परिसराकडे वळत आहेत़ काही निसर्गप्रेमी पर्यटक भर पावसामध्ये सातपुड्याची सैर करत असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान पावसाचा जोर वाढत असल्याने नर्मदा काठावरच्या गावांचा संपर्क तुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़मुसळधार पावसामुळे नर्मदा काठावरील गावांना तसेच सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया अनेक गावांना जोडणारा पिंपळखुटा ते जांगठी रस्ता बंद पडण्याची भिती आहे़ रस्त्यावर एकेठिकाणी मोठे भगदाड पडले असल्याने तो वाहून जाण्याची शक्यता आहे़ याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास संपर्क तुटण्याची शक्यता आहे़दरम्यान तालुक्यातील मोलगी ते अक्कलकुवा रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने यंदा वाहतूक बंद पडण्याचा धोका कमी झाला आहे़ गेल्या वर्षी झालेल्या अतीवृष्टीत हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता़ काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने रस्ता काम नव्याने सुरू केले होते़ यातून ढापे आणि फरशी पूल सुस्थितीत असल्याची माहिती आहे़