संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोठली जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:49 IST2019-08-01T12:49:24+5:302019-08-01T12:49:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातून कोठली, ता.नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता ही ...

Sant Gadge Baba Village is the first in Kothali district in the sanitation campaign | संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोठली जिल्ह्यात प्रथम

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोठली जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातून कोठली, ता.नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
जिल्ह्यात यंदा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत 11 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. या ग्रामपंचायतींच्या कामांची पहाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महिला व बाल कल्याण आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता.
या समितीने नुकताच निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार, कोठली ग्रामपंचायतीने 200 पैकी सर्वाधिक 158 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. पुरुषोत्तमनगर, ता.शहादा व लहान कडवान, ता.नवापूर ग्रामपंचायतीने प्रत्येकी 144 गुण मिळवून संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 133 गुण मिळवून देवमोगरा, ता.नवापूर ग्रामपंचायत तिसरी आली आहे. 
कोठली, ता.नंदुरबार ग्रामपंचायतीने हगणदारीमुक्त गाव, प्लॅस्टिकमुक्त गाव तसेच पाणी फाऊंडेशनअंतर्गत कामे केली    आहेत. लवकरच या गावांना गौरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.        

Web Title: Sant Gadge Baba Village is the first in Kothali district in the sanitation campaign