शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

आरटीओ व बांधकाम विभागावर दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एक-दोन नव्हे तर तब्बल 13 प्रवाशांचा बळी घेणा:या रविवारच्या निमगूळजवळील भीषण बस अपघाताला राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : एक-दोन नव्हे तर तब्बल 13 प्रवाशांचा बळी घेणा:या रविवारच्या निमगूळजवळील भीषण बस अपघाताला राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याने या विभागाच्या विभाग प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल झाला पाहिजे, असा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.हृदय हेलावून टाकणारी आणि तितकाच संताप व्यक्त करणारा अपघात रविवारी निमगूळ, ता.शिंदखेडा गावाजवळ घडला. रात्रीच्या अंधारात औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 24 प्रवासी जखमी झाले. छिन्न-विछिन्न           झालेले मृतदेह, वेदनेने विव्हळणारे प्रवासी, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांचा आक्रोश हा अपघातानंतरचा प्रसंग हृदय हेलावणारा होता. सोमवारी शहरात एकापाठोपाठ एक निघालेल्या प्रेतयात्रा केवळ मृतांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर समस्त शहादेकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणा:या होत्या. अशा या दु:खद प्रसंगातही अपघातास कारणीभूत ठरणा:या राज्य परिवहन महामंडळ, रस्त्यांची दुर्दशा झालेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अवजड वाहनांमुळे वारंवार अपघात होऊनही डोळ्यावर पट्टी बांधणा:या आर.टी.ओ. विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता.शहादा आगाराचा नाशिक विभागात सर्वाधिक उत्पन्न देणा:या आगारांमध्ये समावेश असूनही धुळे येथून शहाद्याला येण्यासाठी रात्री साडेआठ वाजता औरंगाबाद-शहादा ही शेवटची बस आहे. नाशिक, जळगावला गेलेले शहादेकर परतीच्या प्रवासासाठी धुळ्याहून औरंगाबाद बस सापडावी म्हणून कसरत करीत धुळ्यार्पयत येतात. रात्री साडेआठ वाजेनंतर शहाद्यासाठी अजून एक बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांची असूनही परिवहन महामंडळातर्फे  दुर्लक्ष करण्यात येत आहे. कार्यालयीन व खाजगी कामासाठी नाशिकला जाणा:या प्रवाशांची संख्याही मोठी असून दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळी शहाद्यासाठी बसच नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. यासाठी सायंकाळी नाशिक-शहादा बस सुरू करावी या प्रवाशांच्या मागणीलाही परिवहन महामंडळाने केराची टोपली दाखविली आहे. ही बस सुरू झाल्याने धुळ्याहून       परतीच्या प्रवाशांना औरंगाबाद   बसला ही बस पर्याय ठरू शकते.         परंतु एस.टी.च्या अधिका:यांच्या मनमानी कारभाराने प्रवासी कंटाळले आहेत.जिल्ह्यातील आर.टी.ओ. विभाग तर केवळ लुटायलाच असल्याची प्रतिक्रिया जनतेत आहे. रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना 10 चाकी, 12 चाकी मोठमोठे ट्रॉल्या, कंटेनर चालतातच कसे असा गंभीर प्रश्न आहे. जड वाहने फक्त दिवसाच चालविण्याचा नियम असताना रात्री या वाहनांना परवानगी कशी मिळते? क्षमतेपेक्षा जास्त भारमान असलेली वाहने भरधाव वेगाने चालत असूनही आर.टी.ओ. विभागाला हे कसे दिसत नाही? खाजगी अवैध वाहतूक करणा:या वाहनांच्या टपावर जीव मुठीत धरुन प्रवास करणारे प्रवासी आरटीओंना दिसत नाहीत हादेखील एक चमत्कारच म्हणावा लागेल. आरटीओंच्या दुर्लक्षामुळेही मोठय़ा प्रमाणात अपघात घडत असल्याने हा विभागही रविवारच्या घटनेस जबाबदार आहे. मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर नंदुरबार जिल्हा असल्याने जिल्ह्यात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. वाहनांचे प्रकार आणि संख्या बघता रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अंकलेश्वर-ब:हाणपूर हा महामार्ग असूनही हा रस्ता सिंगल आहे. सोनगीर ते शहादा हा मार्ग सिंगल आहे. वाहनांची वर्दळ बघता हे दोन्ही मार्ग दुहेरी असण्याची गरज आहे. परंतु सिंगल मार्ग असूनही रस्त्यातील खड्डय़ांमुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेयुक्त सिंगल रोडदेखील अपघातांना कारणीभूत आहेत. या रस्त्यांवर वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडत नाही.शिरपूर, सोनगीर, तळोदा या मार्गावर वारंवार अपघात घडूनही आर.टी.ओ. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त असल्याने रविवारची दुर्घटना घडून 13 जणांना जीव गमवावा लागला हे दुर्दैवी आहे.