शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रोझवा प्रकल्पाची गळती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील कोरडा ठाक झालेला रोझवा लघुप्रकल्पात जलसाठा होताच पुन्हा संरक्षक भिंत तसेच पाटचारीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील कोरडा ठाक झालेला रोझवा लघुप्रकल्पात जलसाठा होताच पुन्हा संरक्षक भिंत तसेच पाटचारीच्या व्हॉल्वमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रकल्पात येणारा जलसाठा तर दुसरीकडे गळतीमुळे वाहणारे पाणी हे दृश्य पाहून शेतकरी व पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही संबंधितांनी गांभीर्याने या दुरूस्तीकडे लक्ष न घातल्याने प्रकल्पाला गळती असल्याचे बोलण्यात येत आहे. दरम्यान रोझवा प्रकल्पाच्या जलसाठय़ावरच रांझणी, रोझवा परिसरासह आमलाड, तळवे, शिवारार्पयतच्या विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळी अवलंबून असते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी लघुप्रकल्पाला भेट देवून किती जलसाठा झाला हे बघतात. परंतु त्याची पाणीगळतीचे दृश्य पाहून निराशा होत असून, संबंधित विभागाने अजूनही सांडपाण्याच्या भिंतीची अध्र्यापेक्षा जास्त पाणीविना राहिलेल्या भिंतीची दुरूस्ती तसेच पाटचारीच्या व्हॉल्वची दुरूस्ती केल्यास वाहणा:या पाण्याची मात्रा कमी होऊ शकते, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

लघु प्रकल्पात जलसाठा होत असला तरी मोठय़ा प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने यंदा लघुप्रकल्प ओव्हर फ्लो होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील शेतक:यांना रब्बी पिकाबाबतही असलेल्या आशा धुसर झाल्या आहेत.