शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.स्तरावरील रोहयोची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या आठ महिन्यांपासून मानधन थकल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या आठ महिन्यांपासून मानधन थकल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील रोजगार हमीची कामेदेखील ठप्प झाली आहे. मजुरांपुढेही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतील प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने थकीत मानधन द्यावे, अशी मागणी सेवकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी रोजगार सेवकांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.केंद्रशासनाकडून स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महात्मा गांधी रोजगार योजना राबविली जात आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत कामे सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती संबंधीत ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली आहे. केंद्रशासनाकडून कामाच्या स्वरूपात संबंधीत ग्रामरोजगार सेवकास मानधन दिले जात असते. नंदुरबार जिल्ह्यात साधारण 525 ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेवकांमार्फत रोजगार हमी योजनेवरील मजुरांचे रोजची हजेरी मस्टर भरणे, तालुका मुख्यालयी जावून मस्टर जमा करणे, एम बी रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, जॉब कार्ड तयार करणे आदी कामे केली जातात. साहजिकच शासनाची योजना प्रभावी प्रमाणे राबविण्याचे काम हे रोजगार सेवक करीत असतात. तथापि त्यांचे मानधन गेल्या आठ महिन्यांपासून थकले आहे. त्यांना जानेवारी महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही. मानधनाअभावी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. मानधनासाठी त्यांनी तालुका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु वरून उपलब्ध झाले नसल्याचे मोघम उत्तर दिले जात आहे. मानधनासाठी वैतागलेल्या या रोजगार सेवकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात   रोजगार हमीची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी मजुरांपुढे ही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.    वास्तविक रोजगार हमी योजनांसाठी ग्रामरोजगार सेवक शासन आणि मजूर यांचा दुवा ठरत आहे, असे असतांना त्यांचे मानधन थकवून प्रशासन त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, आपल्या थकीत मानधनासाठी सोमवारी जिल्हा प्रशासनाची भेट घेवून याबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपसिंग चौधरी, उपाध्यक्ष सुभाष पाडवी, सचिव नवनाथ ठाकरे, आकाश नाईक, खुशाल पारा, सखाराम राऊत, महेश वळवी, गोकूळदास गावीत, गणेश सूर्यवंशी, कैलास बिरारे, कृष्णा ठाकरे, मणिलाल पवार, अजय भिल, विश्वास वळवी, आनंद वळवी यांनी दिला आहे.