नंदुरबारात दरोडा, शेतकऱ्याकडील १३ लाख ९४ हजार लुटले

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: March 10, 2023 07:46 PM2023-03-10T19:46:23+5:302023-03-10T19:46:42+5:30

नंदुरबार - कापूस विक्री करून गावी जाणाऱ्या दोन शेतकऱ्यांकडून १३ लाख ९४ हजार रुपये चौघांनी लुटल्याची घटना नंदुरबारातील भालेर ...

Robbery in Nandurbar, 13 lakh 94 thousand looted from farmer | नंदुरबारात दरोडा, शेतकऱ्याकडील १३ लाख ९४ हजार लुटले

नंदुरबारात दरोडा, शेतकऱ्याकडील १३ लाख ९४ हजार लुटले

googlenewsNext

नंदुरबार - कापूस विक्री करून गावी जाणाऱ्या दोन शेतकऱ्यांकडून १३ लाख ९४ हजार रुपये चौघांनी लुटल्याची घटना नंदुरबारातील भालेर रस्त्यावर उड्डाणपुलाखाली शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.भालेर येथील शेतकरी हंसराज दगाजी पाटील व सुनील गंगाराम पाटील हे गुजरातमध्ये कापूस विक्री करून नंदुरबारात परतले होते. शुक्रवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास दुचाकीने नंदुरबारहून भालेरला जात होते. 

वळण रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खाली त्यांना कारचालकाने अडवून त्यांच्याकडील १३ लाख ९४ हजार रुपये लुटले. ही घटना दोघांनी जवळच असलेल्या तालुका पोलिसात सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सुनील गंगाराम पाटील, रा.भालेर यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण चव्हाण करीत आहे.
 

Web Title: Robbery in Nandurbar, 13 lakh 94 thousand looted from farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी