शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरणाजवळील वळणावर रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून कोळदा ते खेतिया रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शहादा ते खेतीया ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून कोळदा ते खेतिया रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शहादा ते खेतीया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या वळणावर कच्चा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता पहिलाच पावसात खचल्याने कामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान यामुळ वाहतुकीलाही अडथळा ठरत आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोळदा ते खेतियारस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील काही भागात रस्तादेखील पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याच मार्गावरील शहादा ते खेतीया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळी वळणावरील रस्त्याचे काम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून बंद पडले होते. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्य लॉकडाऊन करून सर्व क्षेत्रातील बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. यानंतर सुसरी धरण वळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता रूंदीकरण तसेच उंची वाढवण्यासाठी माती मिश्रित मुरूम टाकून भराव करण्यात आला. परंतु हा भराव पाहिल्याच पावसात खचून गेल्याने सुरू असलेला रस्ता दर्जेदार होईल का? असा प्रश्न चिन्ह नागरिकांसह वाहनधारकांमध्ये उपस्थित केला जात आहे. तरी या मार्गावरील भराव योग्य पद्धतीने करून रस्ता दर्जेदार करण्याची अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.दरम्यान संबंधितांनी पावसाळा सुरू होण्याआधीच या मार्गावर तातडीने उपाय योजना करून या मार्गावरील पुढील धोका टाळण्याकरीता तातडीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.

मध्यप्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, या मार्गावर नेहमी वाहनाची वर्दळ असते. या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता भरावासाठी माती मिश्रित मुरूमाचा वापर करण्यात येत आहे. हा माती मिश्रित मुरूम पावसाळा सुरू होताच खचण्याची भीती अधिक आहे. तसेच या रस्त्याच्या आजू बाजूस मोठ्या प्रमाणावर खड्डा असल्याने रस्ता खचून अपघात होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.