शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नेत्यांनी पायपीट केलेला रस्ता २५ वर्षांनंतरही अपूर्णच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

सातपुड्यातील खडकी, ता.धडगाव येथे कुपोषणाने मोठ्या प्रमाणावर बालकांचा बळी गेला होता. ही घटना सामाजिक कार्यकर्ते आणि वृत्तपत्रातून बाहेर आल्यानंतर ...

सातपुड्यातील खडकी, ता.धडगाव येथे कुपोषणाने मोठ्या प्रमाणावर बालकांचा बळी गेला होता. ही घटना सामाजिक कार्यकर्ते आणि वृत्तपत्रातून बाहेर आल्यानंतर त्यावेळी संपूर्ण राज्य शासन हादरले होते. तत्कालीन आदिवासी विकासमंत्री स्व.गो.शि. चौधरी, आरोग्यमंत्री स्व.डॉ.दौलतराव आहेर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्या भागात दौरा केला. त्यानंतर स्वत: तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यावेळची अवस्था अशी होती की, तोरणमाळपासून पुढे सातपुड्यातील गावांमध्ये थेट नर्मदा नदीपर्यंत रस्तेच नव्हते. त्यामुळे डोंगरदऱ्यातील रस्त्यावर पायपीट करीत गावांना पोहोचणे हा एकमेव मार्ग होता. मंत्र्यांनी तोरणमाळ ते खडकी हे सात किलोमीटरचे अंतर पायी जाऊन भेट दिली. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांची वेळ आली त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर कुठे उतरवावे यासाठी अधिकाऱ्यांची धांदल उडाली. खडकी या गावाला हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तांत्रिक अडचण असल्याने सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसाठी खडकी पॉईंटवर हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून सात किलोमीटर पायी मुख्यमंत्र्यांना जावे लागणार होते. अधिकाऱ्यांना ती बाब सहन झाली नाही. त्यामुळे सर्व तांत्रिक अडथळे पार करीत रात्रीतून खडकी गावात हेलिपॅड तयार करण्यात आले व मुख्यमंत्र्यांना थेट तेथे उतरवण्यात आले. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तेव्हा तेथे रस्तेच नसल्याची बाब समोर आली. त्यांचे दु:ख पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचेही डोळे पाणावले आणि भरलेल्या हृदयाने त्यांनी ‘आजपासूनच रस्त्याचे काम सुरू करा...’ असे अधिकाऱ्यांना आदेश दिले. मुळातच हा रस्ता इतका घाटाचा की त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. पुढे १० वर्षांनी तत्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी खासदार निधीतून काही निधी दिला. पण त्यातूनही काम झाले नाही. अखेर पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत २०१३ मध्ये रस्त्याला मंजुरी मिळाली आणि ४८ कोटींच्या रस्त्याचे काम तेव्हापासून सुरू आहे. अजूनही ते पूर्ण झालेले नाही. हा रस्ता आता शनिवारी झालेल्या अपघाताने चर्चेत आला आहे.

एकूणच या रस्त्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. कुपोषणाच्या घटनेच्या पाहणीसाठी तेव्हाचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड हे गावापर्यंत गेले. पण परत येताना त्यांना याच रस्त्यावरुन झोळी करुन आणावे लागले होते. त्यांच्यासोबतच्या आमदारांनी रस्त्यावरची कसरत पाहून आधीच माघार घेतली होती. नेत्यांनी इतकी कसरत केलेल्या रस्त्याचे काम २५ वर्षांतही पूर्ण होऊ नये ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. कुपोषणाने अनेक बालकांच्या मृत्यूनंतर तेव्हाच्या सरकारला रस्ता करण्याची कल्पना सुचली. आता या अपघाताच्या घटनेनंतर तरी रस्ता तत्काळ पूर्ण करण्याची सुबुद्धी सरकारला येवो हीच अपेक्षा.