शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदाराची हातचलाखी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी ग्रामस्थांनी गुरुवारी रेशन धान्य वाटप बंद पाडून तहसीलदारांनी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आडगाव येथील रेशन दुकानास भेट देऊन चौकशी केली असता रेशन दुकानदार हातचालाखी करीत धान्य वाटप करताना कमी धान्य देत असल्याचे समोर आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पी.एस. रावताळे यांनी गुरुवारी सकाळी धान्य वाटप करण्यासाठी सुरुवात केली. मिळालेल्या धान्याची एका लाभार्थीने घरी पुन्हा मोजणी केली असता प्रत्येक धान्यमागे किमान दोन किलो धान्य कमी आढळून आले. हा प्रकार इतर ग्रामस्थांनाही समजल्यानंतर दुकानात घेऊन गेलेल्या धान्यासह लाभार्थींनी रेशन दुकानाबाहेर गर्दी केली. ज्यांनी धान्य घेतले होते त्याची पुन्हा रेशन दुकानात मोजणी केली असता १० ते २० किलो धान्यात दीड ते दोन किलो धान्य कमी भरले. त्यामुळे ग्रामस्थांनी रेशन दुकानातील वजन-काटा ताब्यात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात जमा केला होता. वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना हा प्रकार दाखवू असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.‘लोकमत’ने शुक्रवारी हे वृत्त प्रसिद्ध करताच पुरवठा अधिकारी एस.सी. परदेशी, पुरवठा निरीक्षण अधिकारी पंकज खैरनार यांनी आडगाव रेशन दुकानास भेट दिली असता हा काय प्रकार आहे याची चौकशी करण्यात सुरुवात केली. त्यात प्रत्यक्ष वजनकाटा वापरून त्याचे प्रमाण घेण्यात आले. या वेळी प्रत्येक मोजणीमागे एक किलो ३०० ग्रॅम धान्य कमी भरत असल्याचे निर्दशनास आले. हे कमी वजन मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणाºया तगारीचे होते, असे दिसून आले. यावरून वजनकाटा योग्य होता परंतु स्वस्त धान्य दुकानदार हा त्याच्या हातचलाखीने हे मोजमाप करीत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचा पंचनामा गावातील पाच पंचांसमोर करून अहवाल पुढे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.